लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आठवड्यात कैरानामधल्या जाहीर सभेत वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना, उत्तर प्रदेशमध्यातील गुन्हेगारांना चेतावणी दिली होती की एकतर स्वेच्छेने तुरुंगात जाण्याचा मार्ग निवडा किंवा मरण स्विकारा. या त्यांच्या वक्तव्यानंतर, बुधवारी कैराना येथे गुन्हेगार फुरकानने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्याची घटना घडली. याशिवाय कुख्यात माफिया सुशील मिशी यानेही आत्मसमर्पण केले आहे. (CM Yogi Aadityanath warning on strict action against criminals, criminal surrenders in UP Court)
योगी सरकारद्वारे सातत्याने माफियांवर कारवाई सुरू आहे. माफियांना अटक करून त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवला जात आहे किंवा सरकार मालमत्ता ताब्यात घेत आहे. माफियांना तुरुंगात पाठवले जात आहे किंवा त्यांना चकमकीत मारले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगार आता हादरले असून आत्मसमर्पण करण्याचं प्रमाण वाढलयं.
सहारनपूर विभागाचे डीआयजी डॉ प्रीतींदर सिंग यांनी सांगितले की, फुरकान आणि सुशील मिशाने कारवाईच्या भीतीने आत्मसमर्पण केले. त्यांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली असून अन्य बेनामी मालमत्तांची चौकशी सुरू आहे. कुख्यात सुशील मिशा आणि फुरकान यांचा मोठा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे. माफियांना आश्रय देणारे आणि त्यांना सहकार्य करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचीही ओळख पटवून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे डीआयजींनी सांगितले.
दाऊदचा हस्तक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया डेव्हिडचा इमारतीवरुन पडून जागीच मृत्यू, पोलिसांचा प्लॅन फसला!https://t.co/Iq4UttBs2S#Crime #Mumbai #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2021
हे ही वाचा –
(after CM Yogi Aadityanath warning on strict action against criminals criminal surrender in UP Court)