lakshadweep Tourism | कधीकाळी लोकांच्या फिरण्याच्या फेवरेट लिस्टमध्ये मालदीव टॉपवर होतं. पण आता मालदीवला भारताशी पंगा महाग पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतात मालदीवबद्दल प्रचंड संतापाची भावना आहे. त्याचा फटका मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसला आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. त्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड सुरु झाला. आता प्रत्यक्ष त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातील काही ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवची फ्लाइट बुकिंग रद्द केली. आता भारतीयांनी सुद्धा मालदीवला प्रत्यक्ष आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लक्षद्वीपचा दौरा केला. त्यांनी मालदीवच्या सुंदर समुद्र किनाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. भारताला डिवचणाऱ्या मालदीवला याची किंमत चुकवावी लागत आहे.
लोक आता मालदीव सोडून लक्षद्वीप फिरण्याच प्लानिंग करतायत. लक्षद्वीपची मार्च पर्यंतची सर्व तिकिट बुक झाली आहेत. ट्रॅव्हल कंपनी आणि पोर्टलवर लक्षद्वीप सर्वाधिक ट्रेंड होणारा कीवर्ड बनलाय. 200% लोक लक्षद्वीपबद्दल सर्च करतायत. लक्षद्वीपसाठी स्वस्त प्लान्स शोधण्यासह फिरण्यासाठी कुठले बीच आहेत? ते सर्च केलं जातय.
मालदीवला दर आठवड्याला किती विमान जातात?
मालदीवला दर आठवड्याला देशातील वेगवेगळ्या शहरातून 60 विमान जातात. पण लक्षद्वीपसाठी रोज एकच विमान आहे. या विमानाची मार्च पर्यंतची सर्व तिकीट आताच बुक झाली आहेत. सरकारी एयरलाइन कंपनी अलायंस एयर या रुटवर 70 सीटर टर्बोप्रॉप एटीआर-72 एयरक्राफ्ट ऑपरेट करत आहे. डिमांड वाढल्यानंतर कंपनी आता लक्षद्वीपसाठी विमानांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.
लक्षद्वीपसाठी हे परमिट हवं
भारतीय पर्यटकांना लक्षद्वीपला जाण्यासाठी एंट्री परमिट घ्याव लागतं. आधी बँकेत जाऊन 200 रुपये जमा करावे लागतात. त्यानंतर चालान जमा कराव लागतं. आता ही प्रोसेस ऑनलाइन केली आहे. एक-दोन दिवसात परमिट मिळतय. त्यासाठी तुम्हाला काही फी द्यावी लागते.
लक्षद्वीपसाठी फि किती?
लक्षद्वीप परमिटसाठी अर्ज करत असाल, तर फी किती आहे? त्या बद्दलही जाणून घ्या. रिपोर्ट्सनुसार, प्रति आवेदक आवेदन शुल्क 50 रुपये आहे. 12 से 18 वर्षाच्या मुलांसाठी 100 रुपये आणि एखादी व्यक्ती 18 वर्षाच्या पुढे असेल तर 200 रुपये चार्ज केले जातात.
मालदीव बरोबरच्या वादानंतर ज्या लोकांनी भविष्यात मालदीवला जाण्याचा प्लान केला होता, त्यांनी आपली तिकिट रद्द केली आहेत. दुसऱ्या ठिकाणी फिरण्याचा प्लान बनवलाय.