मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने युद्धनौका (Indian Navy warship) आणि पाणबुडींच्या (Submarine) बांधकाम क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी आयएनएस विशाखापट्टणम (INS Vishakhapatnam) भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आणि आता नौदलाला कलवरी वर्गाची चौथी पाणबुडी, आयएनएस वेला (INS Vela) ही मिळणार आहे. ही पाणबुडी 25 नोव्हेंबरला नौदलात दाखल होणार आहे.
आयएनएस वेला मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी आणि आयएनएस करंज भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. या सर्व पाणबुड्या फ्रेंच स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडींच्या तंत्रज्ञानावर बनवण्यात आल्या आहेत, ज्या जगातील सर्वोत्तम पाणबुड्यांपैकी मानल्या जातात.
INS Vela 75 मीटर लांब आणि 1615 टन वजनाची आहे. यात 35 नौसैनिक आणि 8 अधिकारी बसू शकतात. ही पाणबुडी समुद्राखाली 37 किलोमीटर (20 नॉटिकल मैल) वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राखालून एका फेरीत 1020 किमी (550 नॉटिकल मैल) अंतर कव्हर करू शकते आणि 50 दिवस समुद्रात राहू शकते.
#Vela – A Testimony to #AatmaNirbharBharat, Cutting Edge Technology & Dedicated #Teamwork.
Fourth of the Project 75 Submarine built by #MazagonDockLimited is all set to be Commissioned into #IndianNavy on #25Nov 21.@DefenceMinIndia @SpokespersonMoD @PIB_India @PBNS_India pic.twitter.com/XGehqXG6yE
— SpokespersonNavy (@indiannavy) November 24, 2021
शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी आयएनएस वेलामध्ये 18 टॉर्पेडो आहेत. याशिवाय, 30 सागरी बोगदेही बनवता येऊ शकतात, ज्यामुळे शत्रूची जहाजांवर हल्ला करून नष्ट करता येतील. ही पाणबुडी क्षेपणास्त्रांनीही सुसज्ज आहे.
काही दिवसांपूर्वी आयएनएस विशाखापट्टणम भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली होती. ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 21 नोव्हेंबर औपचारिकपणे INS विशाखापट्टणमला भारतीय नौदलात सामील कली. ऑक्टोबर 2013 मध्ये या युद्धनौकेचे बांधकाम सुरू झाले. या युद्धनौकेचे वजन 7400 टन असल्याचे सांगण्यात येत आहे. INS विशाखापट्टणमची एकूण लांबी ट्रेनच्या 7 डब्यांच्या लांबीइतकी 535 फूट आहे. भारतीय नौदलाची ही पहिलाी PB15 स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक युद्धनौका आहे. भारताची सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र यंत्रणा यात बसवण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. शत्रूचे जहाज पाहताच आयएनएस विशाखापट्टणम विमानाने क्षेपणास्त्रे डागून शत्रूचा नाश करू शकते.
इतर बातम्या-