धक्कादायक ! मणिपूरनंतर आता बंगालमध्ये… चोरीच्या आरोपावरून दोन महिलांना नग्न करून बेदम मारहाण

| Updated on: Jul 22, 2023 | 10:59 AM

मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ही घटना ताजी असतानाच पश्चिम बंगालमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक ! मणिपूरनंतर आता बंगालमध्ये... चोरीच्या आरोपावरून दोन महिलांना नग्न करून बेदम मारहाण
Follow us on

कोलकाता | 22 जुलै 2023 : मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ही घटना ताजी असतानाच पश्चिम बंगालमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळील आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन महिलांना नग्न करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या महिलांवर चोरीचा आरोपही ठेवण्यात आला आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे केंद्रीय सह प्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेची माहिती ट्विट करून दिली आहे. तसेच या घटनेवरून मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर भाजपच्या खासदार लॉकेट चटर्जी यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. दरम्यान, टीव्ही9 नेटवर्कने या व्हिडीओची सत्यता पडताळली नाहीये. त्यामुळे टीव्ही9 या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी करत नाहीये.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडीओत?

या घटनेचा व्हिडीओ भाजप नेत्यांनीच पुढे आणला आहे. मालदाच्या बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकुआहाट येथे ही घटना घडल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. या ठिकाणी मंगळवारचा बाजार भरतो. या बाजारात पाकिटमारीच्या आरोपावरून दोन महिलांना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण मारहाण करण्यात आली. अमित मालवीय यांनी पोस्ट केलेल्या या व्हायरल व्हिडीओत महिलांना मारहाण सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कुणाच्या हातात बूट आहे, तर कोणी या महिलांचे केस ओढत आहेत. काही लोक लांबूनच ओरडत आहेत. या महिलांना अजून मारू नका असं म्हणत आहेत.

पोलीस बघ्याच्या भूमिकेत

पश्चिम बंगालमध्ये दहशतीचा कहर सुरूच आहे. मालदाच्या पाकुआ हाट परिसरात दोन आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. त्या महिलांचा छळ करण्यात आला. त्यावेळी पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते, असं अमित मालवीय यांनी म्हटलं आहे. 19 जुलै रोजी सकाळी ही भयानक घटना घडल्याचं मालवीय यांनी म्हटलं आहे. ही घटना पाहून ममता बॅनर्जी यांचं हृदय तिळतिळ तुटायला हवं होतं. या घटनेवर त्यांनी कारवाई करायला हवी होती. कारण त्या बंगालच्या गृहमंत्रीही आहेत, असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

ममतादीदी अपयशी

ममता बॅनर्जी यांनी अशा घटनांवर काहीच न करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यांनी या घटनेवर साधा निषेधही नोंदवलेला नाहीये. अशा घटनांमधून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या खासदार लॉकेट चटर्जी यांनी ट्विट व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे. केवळ राज्यांची ही गोष्ट नाही. मणिपूर काय आणि पश्चिम बंगाल काय. या देशातील प्रत्येक मुलीला जाती, धर्म, पंथ आणि राजकारणाची पर्वा न करता सन्मान देण्याची गरज आहे. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये दोन महिलांवर हल्ला केला जातोय ही धक्कादायक घटना आहे, असं चटर्जी यांनी म्हटलं आहे.