PM Modi Ukraine Visit : आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठा डाव, पीएम मोदी युक्रेनला जाणार

| Updated on: Jul 27, 2024 | 10:03 AM

PM Modi Ukraine Visit : मागच्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. नुकताच पीएम मोदी यांनी रशियाचा दोन दिवसीय दौरा केला होता. ते रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटले होते. आता पीएम मोदी थेट युक्रेनला जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील ही एक मोठी घडामोड आहे.

PM Modi Ukraine Visit : आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठा डाव, पीएम मोदी युक्रेनला जाणार
pm narendra modi - ukraine president volodymyr zelenskyy
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आत पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार आहेत. दिल्लीमधील युक्रेन दुतावासाने या वृत्ताल दुजोरा दिला आहे. पीएम मोदी या दौऱ्यात युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांची भेट घेणार आहेत. याआधी पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला. यावेळी त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. भारत-रशिया वार्षिक शिखर सम्मेलनात पीएम मोदी सहभागी झाले होते.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिला युक्रेन दौरा आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास मोदी यांचा हा दौरा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. युक्रेनमध्ये 24 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. रशिया-युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे. पीएम मोदी यांचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचे रशियासोबतही खूप चांगले संबंध आहेत. पीएम मोदींच्या युक्रेन दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धविरामाचा मार्ग सापडेल अशी अपेक्षा आहे.

पीएम मोदी रशियाला कधी गेलेले?

मागच्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. ही लढाई सुरु होऊन, 882 पेक्षा जास्त दिवस झालेत. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झालेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिला दौरा आहे. पीएम मोदी 8-9 जुलैला रशियाला गेले होते. त्यावेळी पीएम मोदींनी पुतिन यांना शांततेच आवाहन केलं होतं.

या दौऱ्याच महत्त्व काय?

पीएम मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांना भेटल्यानंतर काही गोष्टींवर सहमती बनू शकते. मोदींनी यापूर्वीच दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याच अपील केलय. मोदींच्या युक्रेन दौऱ्यानंतर शांततेचा मार्ग सापडेल अशी काही देशांना अपेक्षा आहे. या युद्धात दोन्ही बाजूच्या सैनिकांसह अनेक निरपराध माणसं मारली जात आहेत.

याआधी जेलेंस्की बरोबर कुठे भेट झालीय?

पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याची जोरात तयारी सुरु आहे. याआधी 13 ते 15 जून दरम्यान मोदी जी-7 समिटसाठी इटलीला गेले होते. त्यावेळी तिथे युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्यासोबत भेट झालेली. युक्रेनच्या विद्यमान स्थितीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली. त्यावेळी सुद्धा मोदींनी भारत शांततेने तोडगा काढण्याच समर्थन करतो, हे स्पष्ट केलेलं. ऑक्टोबर 2022 मध्ये पीएम मोदी आणि राष्ट्रपती जेलेंस्की यांची फोनवरुन चर्चा झालेली. फोनवरच्या चर्चेत राष्ट्रपती जेलेंस्की यांनी पीएम मोदींना युक्रेन भेटीच निमंत्रण दिलं होतं.