नवी दिल्ली : चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हरने चंद्राच्या पुष्ठभागाच परीक्षण सुरु केलय. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या लँडिंगच्यावेळी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये होते. BRICS परिषदेसाठी पंतप्रधान मोदी तिथे गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी तिथून लाइव्ह मिशन पाहिलं. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर ISRO च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. ग्रीस दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये उतरतील. इथे इस्रोच मुख्यालय आहे.
परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर 26 ऑगस्टला सकाळी 7 वाजता मोदी थेट इस्रोच्या मुख्यालयात येतील. तिथे ते संपूर्ण चांद्रयान-3 च्या टीमला भेटतील.
रोड शो ची तयारी
पंतप्रधान मोदी यांचं बंगळुरुमध्ये आगमन झाल्यानंतर भाजप एक छोटा रोड शो आयोजित करण्याच्या तयारीत आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील. दिल्ली एअरपोर्टवर सुद्धा पंतप्रधान मोदींच्या भव्य स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
स्वागतासाठी असणार जवळपास 10 हजार कार्यकर्ते
पीएम मोदी दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर 26 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता पोहोचतील. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते त्यावेळी तिथे उपस्थित असतील. ढोल-ताशाच्या गजरात पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतसाठी दिल्ली एअरपोर्टवर दिल्ली भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते यतील.
पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारताच्या चांद्रयान-3 च यशस्वी लँडिंग पाहिलं. त्यानंतर त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना देशवासियांना शुभेच्छा दिल्या. चांद्रयान-3 च्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्रावर पोहोचणारा भारत जगातील चौथा देश आहे. याआधी अमेरिका, चीन आणि USSR हे देश चंद्रावर पोहोचले आहेत.