जयपूर : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि बांग्लादेशातून आलेल्या सोनिया अख्तरची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. आता बांग्लादेशातून आणखी एक मुलगी प्रेमासाठी सीमापार करुन आली आहे. हबीबा अस या मुलीच नाव आहे. ढाक्यातून ती राजस्थान श्रीगंगानगर येथील गावात पोहोचली आहे. ज्या प्रेमासाठी ती देशाच्या सीमा ओलांडून भारतात आली, त्या व्यक्तीच लग्न झालय. त्याला एक मुलगा सुद्धा आहे. हबीबा आणि त्या मुलाला पोलीस घेऊन गेले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. रावलाच्या 13 डीओएल गावातील हा विषय आहे. इथे रोशन सिंहच कुटुंब राहतं. 6 महिन्यापूर्वी रोशनच बांग्लादेशच्या हबीबा बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणं सुरु झालं.
आधी दोघांमध्ये बोलण सुरु झालं. हळूहळू रोशन आणि हबीबामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर हबीबाने रोशनल भेटायच ठरवलं. वीजासाठी अर्ज केला. हबीबा बांग्लादेशमधून आधी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे पोहोचली. दिल्लीमधून ती बिकानेरला गेली. आपण येणार आहोत, हे तिने आधीच रोशनला सांगितलं होतं. हबीबा बीकानेर येथे पोहोचल्यानंतर तिने रोशनला कळवलं. रोशल तिला घेऊन घरी आला. हबीबाच्या येण्याने रोशनचे कुटुंबीय हैराण झाले. रोशनच लग्न झालय. त्याला एक मुलगा आहे. अशावेळी ते हबीबाला घरी ठेऊ शकत नाहीत.
हबीबा बद्दल रोशनची आई काय म्हणाली?
हबीबा घरी आली, तेव्हा तिला पंजाबी भाषा समजत नव्हती. ती केवळ हिंदीमध्ये बोलत होती असं रोशनची आई कृष्णाबाई यांनी सांगितलं. रोशनच स्वत:च कुटुंब आहे. हबीबाला पुन्हा मायदेशी पाठवून द्यावं, असं कृष्णाबाई यांनी अपील केलं आहे. मला बांग्लादेशला परत जायच नाहीय, असं हबीबाने सांगितलं. सध्या तिच्याकडे टूरिस्ट वीजा आहे. ती ढाका येथे राहते. घर सोडून इथे आल्याने आपली भरपूर बदनामी झालीय, म्हणून मला परत जायच नाहीय असं हबीबाने सांगितलं.
रोशन किती शिकलाय?
रोशल आणि त्याचा भाऊ दोघे मजुरीच काम करतात असं कृष्णाबाई यांनी सांगितलं. कृष्णाबाई स्वत: नरेगामध्ये काम करते. त्याच्या वडिलांच वर्षभरापूर्वी निधन झालं. रोशनच फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालं आहे.