chandrayaan-3 | ‘चंद्रयान-3 केवळ एकच दिवस…’, भारताच्या यशाने चिडलेल्या चीनी वृत्तपत्रात चंद्र मोहीमेबद्दल केले हे वक्तव्य

| Updated on: Aug 25, 2023 | 9:50 PM

भारताच्या चंद्रावरील सॉफ्ट लॅंडींगचे जगभरात कौतूक होत असताना चीनचे सरकारी वृ्त्तपत्र ग्लोबल टाईम्सने मात्र त्यातील त्रूटी दाखवत स्वत:ची पाठ उगाच थोपटवून घेतली आहे.

chandrayaan-3 | चंद्रयान-3 केवळ एकच दिवस..., भारताच्या यशाने चिडलेल्या चीनी वृत्तपत्रात चंद्र मोहीमेबद्दल केले हे वक्तव्य
chandrayaan-3
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करीत अनोखा विक्रम स्थापित केला आहे. बुधवारी चंद्राच्या डार्कसाईट म्हणजे दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडींग केल्यानंतर जगभरातून भारताची वाहवा होत आहे. चंद्रावर यशस्वी लॅंडर उतरविणाऱ्या भारत चौथा देश ठरला आहे. जगभरातील सर्ववृत्तपत्रांनी या घटनेची टळक दखल घेतली. परंतू चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने मात्र खूप उशीरा 24 ऑगस्टच्या सायंकाळी याची दखल घेतली आहे. काय म्हटले आहे त्यात पाहा..

चंद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण भागावर बुधवारी 23 ऑगस्ट रोजी यशस्वीपणे लॅंडींग केले असून विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हरही कामाला लागला असून त्याने तेथे कामही सुरु केले आहे. एकूण चौदा दिवस रोव्हर चंद्रभूमीवर अभ्यास करुन त्याचे निष्कर्ष इस्रोला पाठविणार आहे. या यशाबद्दल जगभरातील प्रसारमाध्यमे कौतूक करीत असताना चीनचे सरकारी वृ्त्तपत्र ग्लोबल टाईम्सने 24 ऑगस्टच्या सायंकाळी बिजिंग स्थित वरिष्ठ अंतराळ तज्ज्ञ पॅंग झिहाओ यांनी लेख लिहीला आहे.

पॅंग झिहाओ यांनी लेखात म्हटले आहे की चीनने 2010 मध्ये चांग ई-2 लॉंच केल्यानंतर ऑर्बिटर आणि लॅंडरसह सरळ पृथ्वी ते चंद्र ट्रांन्सफर ऑर्बिटमध्ये पाठविण्यास सक्षम आहे. भारताकडे हे तंत्रज्ञान नाही. कारण त्यांच्या लॉंच व्हेइकल्सची क्षमता मर्यादीत आहेत. चीनची तंत्रज्ञान प्रगत असल्याने वेळ आणि इंधनाची बचत होते आहे. चीनचे इंधनही प्रगत आहे. चीनचे रोव्हर खूप मोठा असून त्याचे वजन 140 ग्रॅम आहे. तर भारताच्या रोव्हरचे वजन केवळ 26 किलोग्रॅम आहे. भारताचा प्रज्ञान रात्री काम करण्यास असमर्थ आहे. त्याचे आयुष्य केवळ एक दिवसाचे आहे. ( पृथ्वीचे 14 दिवस ) चीनचा रोव्हर युटु-2 चा चंद्रावर सर्वाधिक वेळ काम करण्याचा रेकॉर्ड आहे. भारत आणि चीनला ब्रिक्स आणि एससीओ मॅकेनिझम अंतर्गत अंतराळ क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. चीनने आपले बाहू फैलावले आहेत. परंतू भू राजनैतिक कारणे त्याआड येत आहेत असेही चीनी वृत्तपत्राने म्हटले आहे.

जगभरातील मिडीयाने घेतली दखल

सौदी अरब, अमेरिका, ब्रिटन, पाकिस्तान आदी देशातील वृत्तपत्रात चंद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडींगच्या बातम्या आल्या आहेत. सौदी अरबच्या अल अरबिया या वृ्त्तपत्राने तर भारताच्या यशस्वी लॅंडींगमुळे अंतराळ क्षेत्रात भारत एक सुपर शक्ती म्हणून पुढे येत असल्याचे म्हटले आहे.  अमेरिकतील सीएनएनने देखील अंतराळ क्षेत्रात जागतिक महाशक्ती म्हणून ही मोहीम भारताला पुढे नेऊ शकते असे म्हटले आहे