पाटना : यूपीच्या ज्योती मौर्य सारख बिहारमध्ये एक प्रकरण समोर आलय. नवऱ्याने बायकोची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वकाही केलं. जेव्हा ती यशस्वी झाली, तेव्हा तिने नवऱ्यालाच दगा दिला. बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये राहणाऱ्या महिलेने प्रेमविवाह केला होता. पुढे जाऊन ती, पोलीस दलात दाखल झाली. त्यानंतर तिने नवऱ्यालाच साइड केलं. आता तिचं विवाहबाह्य प्रेम प्रकरण सुरु आहे. हा आरोप खुद्द तिच्यावर नवऱ्यानेच केला आहे.
बिहारच हे प्रकरण ज्योती मौर्यच्या दोन पावलं पुढे आहे. या कथेची सुरुवात प्रेमाने होते. या कथेत मैत्री, प्रेम, प्रेम विवाह आणि धोका सगळ काही आहे.
प्रिय रंजन ज्योतीला प्रिय राहिला नाही
बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. नवरा प्रिय रंजनने जमीन विकून, कर्ज घेऊन पत्नी ज्योतीला शिकवलं. तिला पोलीस दलात भरती केलं. त्यासाठी लाचेपोटी 10 लाख रुपये दिले. पत्नीला पोलीस दलात नोकरी मिळताच नवरा प्रिय रंजन तिच्यासाठी प्रिय राहिला नाही. ज्योतीला आता नवऱ्यासोबत रहायच नाहीय. कारण ज्योतीला आत सोमेश्वर नाथ झा आवडतो. सोमेश्वर नाथ झा आणि ज्योति एकत्र कोचिंग करत होते. दोघेही एकत्रच पोलीस दलात दाखल झाले.
कधी केलं लग्न?
प्रिय रंजन आणि ज्योतीची आधी मैत्री झाली. पुढे ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. प्रेमसंबंधांच त्यांच नातं 2009 मध्ये विवाहात बदलल. हे कुटुंब दिल्लीला रहायच. प्रिय रंजन रिअल इस्टेट तर ज्योती प्रायव्हेट बँकेत नोकरी करायची. 2012 मध्ये ज्योतीने नोकरी सोडून BPSC ची तयारी सुरु केली. ती गुडगावला कोचिंग क्लाससाठी जायची. या दरम्यान तिला एक मुलगा झाला. त्याच नाव रेयांश आहे.
स्वप्नातही वाटलं नव्हतं ज्योती धोका देईल
नोटबंदीच्या काळात प्रियरंजनच काम ठप्प झालं. दोघे पुन्हा बिहारला आले. कठीण काळातही प्रिय रंजनने ज्योतीच शिक्षण सुरु ठेवलं. बीपीएससीची तयारी करताना ती मुजफ्फरपुरला कोचिंगसाठी जायची. तिथेच तिची ओळख सोमेश्वर नाथ झा सोबत झाली. ओळखीच रुपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं.
प्रियरंजनला या बद्दल कानोकान कळलं नाही. सोमेश्वर नाथ झा ला तो पत्नीचा चांगला मित्र समजत होता. ज्या मुलीसोबत प्रेमविवाह केलाय, तिच्या आयुष्यात दुसऱा कोणी येईल, याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.
ज्योतीने नवऱ्यावर काय आरोप केले?
ज्योती कुमारीने नवरा प्रियरंजनने केलेले सर्व आरोप खोटे असल्याच सांगितलं. नवरा चरित्रहीन आहे. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध आहेत. तो तुरुंगातही जाऊन आलाय असा आरोप ज्योतीने केलाय.