वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी धक्काबुक्की, आमदारच रेल्वे ट्रॅकवर पडल्या…व्हिडिओ आला समोर

| Updated on: Sep 19, 2024 | 3:25 PM

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी समाजवादी पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली होती. दोन्ही पक्षाचे समर्थक आपआपसात भिडले. आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेन आग्रा कॅन्ट येथून संध्याकाळी 4:15 वाजता सुटेल आणि तुंडला येथे 5:05 वाजता पोहचणार आहे.

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी धक्काबुक्की, आमदारच रेल्वे ट्रॅकवर पडल्या...व्हिडिओ आला समोर
आमदार सरिता भदौरिया रेल्वे ट्रॅकवर पडल्या
Follow us on

भारतात सर्वात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्स्प्रेस विविध ठिकाणांवरुन सुरु करण्याची मागणी वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरेन्सने वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. आग्रा ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी एक विचित्र घटना इटावा स्टेशनवर घडली. या स्टेशनवर लोकांनी वंदे भारत ट्रेन पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी इटावाच्या आमदार सरिता भदौरिया वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी स्टेशनवर आल्या. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत त्या रेल्वे पटरीवर पडल्या.

काय घडला प्रकार

आमदार सरिता भदौरिया इटावा स्टेशनवर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहचल्या. त्या प्लॅटफॉर्म उभ्या राहून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत होत्या. त्यावेळी धक्काबुक्की सुरु झाली. त्यात सरिता भदौरिया रेल्वे ट्रॅकवर जाऊन पडल्या. त्या उचलण्यासाठी काही जणांनी त्वरित रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्यांनी त्यांना उचलले. आमदार सरिता भदैरिया या रेल्वे पटरीवर पडताच लोको पायलटने हॉर्न वाजवला.

हे सुद्धा वाचा

भाजप, सपा कार्यकर्त्यांची गर्दी

इटावा रेल्वे स्टेशनवर वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी समाजवादी पार्टीचे खासदार जितेंद्र दोहरे, माजी भाजपा खासदार रामशंकर कठेरिया, भाजप राज्यसभा खासदार गीता शाक्य आणि भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी समाजवादी पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली होती. दोन्ही पक्षाचे समर्थक आपआपसात भिडले. आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेन आग्रा कॅन्ट येथून संध्याकाळी 4:15 वाजता सुटेल आणि तुंडला येथे 5:05 वाजता पोहचणार आहे. इटावा येथे 6:05 वाजता, कानपूर येथे 7:50 वाजता थांबेल आणि रात्री 11:55 वाजता वाराणसीला पोहोचेल. वाराणसीहून दुपारी साडे बारा वाजता सुटून सकाळी ८ वाजता आग्रा पोहोचेल. आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल.