पाटणा : बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीसोबतची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. आता त्यांच्या नव्या सरकारची बहुमतचाचणी पार पडणार आहे. त्याआधी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. लालू यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे. आमदारांच्या वस्तू त्यांच्या घरुन मागवण्यात आले आहेत.
बिहारमध्ये १२ फेब्रुवारीला फ्लोर टेस्ट होणार आहे. जेडीयूने 11 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यात जेडीयूच्या सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांना हैदराबादला पाठवण्यात आले आहे. आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
फ्लोअर टेस्टच्या आधी बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आणखी एक मंत्रीपद हवे आहे. त्यांना आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर सगळा खेळ असणार आहे. फ्लोर टेस्टपूर्वी त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ते गरीब आहेत पण धोकेबाज नाही.
आरजेडी: ७९ आमदार
काँग्रेस : १९ आमदार
CPI(M-L)+CPI+CPI(M): १६ आमदार
विरोधकांकडे एकूण संख्याबळ : ११४ आमदार
AIMIM : १
भारतीय जनता पक्षाचे ७८
जनता दल युनायटेडचे ४५
हिंदुस्थान अवाम मोर्चा ४
अपक्ष आमदार १
एकूण आमदार १२८
भाजपने लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमधील जुन्या सहकारी मित्र पक्षांना पुन्हा एकदा जवळ करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी भाजपने एक कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे विरोधक ही चिंतेत आहे. कारण नितीश कुमार यांनी सोबत घेऊन त्यांनी इंडिया आघाडीला पहिली सुरुंग लावला आहे.
दुसरीकडे काँग्रेसला भीती आहे की, भाजप त्यांच्या आमदारांना देखील फोडू शकते. त्यामुळे काँग्रेसने 14 आमदारांना तेलंगणामध्ये हलवले आहे.