Asaduddin owaisi on UCC | उत्तराखंडमधील भाजपा सरकारने यूनिफॉर्म सिविल कोडशी (यूसीसी) संबंधित विधेयक विधानसभेत सादर केलय. धामी सरकारच्या या विधेयकाची देशभरात चर्चा आहे. विरोधी पक्षाचे नेते या विधेयकावर आपली मत मांडतायत. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विधेयकाला विरोध आहे. यात समाजवादी पार्टीचे खासदार एसटी हसन, बसपाचे मोहम्मद शहजादसह अनेक मुस्लिम नेते या विधेयकाच्या विरोधात आहेत. हैदराबादमधील खासदार AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सुद्धा या विधेयकाच्या विरोधात आहेत. त्यांनी आज या विधेयकावरुन बरेच प्रश्न विचारले आहेत. त्यांनी त्रुटी दाखवून दिल्या. ‘मला माझा धर्म आणि संस्कृतीच पालन करण्याचा अधिकार आहे’, असं ओवैसी म्हणाले. ‘हे बिल मला दुसऱ्या धर्माचे नियम पाळण्यासाठी भाग पाडत आहे’ असं ओवैसी म्हणाले.
“उत्तराखंडच UCC बिल एक हिंदू कोडशिवाय काहीही नाहीय. सर्वप्रथम म्हणजे हिंदुंच्या एकत्रित कुटुंबाला स्पर्श सुद्धा केलेला नाहीय. असं का?. जर तुम्हाला उत्तराधिकारी आणि वारशासाठी एक समान कायदा हवा असेल, तर हिंदुंना बाहेर का ठेवता?. राज्यातील बहुसंख्यांना लागू होत नसेल, तर तो कायदा एकसमान कसा असू शकतो?” असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे.
हा प्रश्न कोणी विचारत नाही
“‘बहुविवाह, हलाला, लिव-इन रिलेशनशिप चर्चेचा विषय आहेत. पण हिंदुंच्या एकत्र कुटुंबाला बाहेर का ठेवलं? हा प्रश्न कोणी विचारत नाही. याची गरज काय होती? हे कोणी विचारत नाहीय” असं ओवैसी म्हणाले. “पुरामुळे उत्तराखंडमध्ये 1 हजार कोटीच नुकसान झालय. 1700 हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. शेतीच 2 कोटीपेक्षा अधिक नुकसान झालय. उत्तराखंडची आर्थिक स्थिती खराब आहे. म्हणून धामी सरकारला या विधेयकाची गरज पडलीय” असा आरोप ओवैसी यांनी केला.
हे अनुच्छेद 25 आणि 29 च उल्लंघन
“बिलमधून आदिवासींना बाहेर का ठेवलय? एका सुमदायाला सूट दिली, तर हे विधेयक समान कसं असू शकतं?. पुढचा प्रश्न मौलिक अधिकारांचा आहे. मला माझा धर्म आणि संस्कृतीच पालन करण्याचा अधिकार आहे. हे विधेयक मला वेगळ्या धर्माच आणि संस्कृतीच पालन करण्यासाठी भाग पाडतं. धर्मात वारसा आणि विवाह हा धार्मिक प्रथेचा भाग आहेत. आम्हाला एकावेगळ्या प्रणालीच पालन करण्यासाठी भाग पाडण हे अनुच्छेद 25 आणि 29 च उल्लंघन आहे” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.