भोपाळ : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये (Madhya Pradesh, Bhind) बबेडी गावाजवळ एअरफोर्सचं एक ट्रेनी विमान (air force trainee aircraft) क्रॅश झालं आहे. विमान पडलं त्या ठिकाणापासून काही अंतरावरच विमानाचे पायलट लेफ्टनंतर अभिषेक हे जखमी अवस्थेत मिळून आले. जखमी पायलटला रुग्णावाहिकेतून तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विमान क्रॅश झाल्यानंतर ते जमिनीत घुसल्याचं पाहायला मिळत आहे. (Air Force trainee plane crashes in Bhind, Madhya Pradesh)
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार एअरफोर्सने सांगितलं की वायुसेनेच्या मिराज 2000 हे विमानाने गुरुवारी सकाळी सेंट्रल सेक्टरमधून उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पायलट लेफ्टनंतर अभिषेक हे विमानातून बाहेर पडले. हे विमान भिंडमध्ये क्रॅश झालं.
Madhya Pradesh | Indian Air Force’s trainer aircraft crashes in Bhind, pilot injured: Bhind SP Manoj Kumar Singh
Details awaited pic.twitter.com/nOlCRGU1D5
— ANI (@ANI) October 21, 2021
दरम्यान, विमान क्रॅश होण्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. अशावेळी अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी एअरफोर्सकडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या विमानात फक्त एक पायलट होते आणि ते विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
An IAF Mirage 2000 aircraft experienced a technical malfunction during a training sortie in the central sector this morning. The pilot ejected safely. An inquiry has been ordered to ascertain the cause of the accident: Indian Air Force (IAF) pic.twitter.com/UTt5NOzrxY
— ANI (@ANI) October 21, 2021
संबंधित बातम्या :
हे फक्त बाई आणि आईच करु शकते, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्युटीवर!
Video : प्रियंका गांधींना मिळाली अपघाताची माहिती, जखमी महिलेला स्वत: केली मलमपट्टी
Air Force trainee plane crashes in Bhind, Madhya Pradesh, The pilot is safe