बांगलादेशमध्ये सत्तापालट होताच भारतात हालचालींना वेग, मोदींना भेटण्यासाठी पोहोचले…

| Updated on: Aug 05, 2024 | 8:56 PM

बांगलादेशमध्ये आंदोलन हिंसक झाल्यानंतर शेख हसीना या पंतप्रधानपद सोडून देश सोडून भारतात यावं लागलं. परिस्थिती बिकट होत असल्याचं दिसताच शेख हसीना यांना पद सोडण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. आता भारतात आल्यानंतर भारतात देखील घडामोडींना वेग आला आहे.

बांगलादेशमध्ये सत्तापालट होताच भारतात हालचालींना वेग, मोदींना भेटण्यासाठी पोहोचले...
Follow us on

Bangladesh india : बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. मोठ्या संख्येने आंदोलका त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने त्यांना काही मिनिटातच देश सोडावा लागला आहे. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांचे विमान दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. या सर्व घडमोडींचा भारतात देखील परिणाम पाहायला मिळत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे शेख हसीना यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. बांगलादेशातील प्रत्येक घडामोडीवर भारताचे लक्ष आहे. बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केलाय. सीमेवर बीएसएफ जवानांची गस्त वाढवण्यात आलीये. बीएसएफचे डीजी स्वतः सीमेवर पोहोचले आहेत. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

भारतात हालचालींना वेग

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्याने भारतात देखील हालचालींना वेग आलाय. शेख हसीना यांचे विमान काही तासांपूर्वीच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. अजित डोवाल आणि शेख हसीना यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली. वेस्टर्न एअर कमांडचे एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशमधील प्रत्येक अपडेट दिली आहे. काही मिनिटांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील परिस्थितीबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना माहिती दिली आहे. शेख हसीना यांचे विमान ज्या पद्धतीने भारतीय भूमीवर आले आणि बांगलादेशातील परिस्थिती यावर पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यात चर्चा झाल्याचे मानले जात आहे.

बांगलादेश सीमेवर बीएसएफने गस्त वाढवली आहे

बांगलादेशामधील बिघडत चाललेली राजकीय परिस्थिती आणि हिंसाचार पाहता परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सूचना जारी केली आहे. त्यांनी नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचे आवाहन केले आहे. एअर इंडियाने ढाकाला जाणाऱ्या विमानसेवा बंद केल्या आहेत. बांगलादेश आणि भारतादरम्यान धावणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झाला आहे. रेल्वे सेवा रद्द केल्यानंतर विमानसेवा देखील बंद करण्यात आली आहे. भारतातील बांगलादेश उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.