Ajmer Sharif Dargah: राजस्थानमधील अजमेर दरगाहसंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. या दाव्यानंतर आता मुस्लिम समुदायाकडून टिप्पणी आली आहे. ऑल इंडिया सूफी सज्जादानशीन काउंसिलचे अध्यक्ष आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचे वंशज सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देशात आता रोज मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे चिश्ती यांनी म्हटले आहे.
अजमेर दर्गासंदर्भात हिंदू सेनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्या कोर्टात सुनावणी झाली. याचिकाकर्ता विष्णू गुप्ता यांच्या दाव्यानंतर न्यायालयाने दरगाह कमेटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआ) यांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना 20 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे म्हटले आहे.
अजमेर न्यायालयात दाखल याचिकेत हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे की, या ठिकाणी भगवान महादेवचे मंदिर होते. अजमेर शरीफ दरगाहला भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर घोषित करण्यात यावे. तसेच दरगाह समितीचा अनाधिकृत अवैध ताबा काढण्यात यावा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला या ठिकाणी सर्व्हेक्षण करण्याची परवानगी द्यावी.
#WATCH | Ajmer, Rajasthan: On a local court directing issuance of notice over a suit claiming Shiva temple in Ajmer dargah, Syed Naseruddin Chishty, Chairman, All India Sufi Sajjadanashin Council, says, "… The concerned parties have been issued notices, one is the Dargah… pic.twitter.com/uftrCjjmCs
— ANI (@ANI) November 27, 2024
सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी म्हटले की, अजमेरचा इतिहास 850 वर्ष जुना आहे. हा दर्गा नेहमीच प्रेम आणि शांतीचा संदेश देते. या दरगाहवर लाखो-कोटी लोकांची श्रद्धेचा विषय आहे. परंतु अशा प्रकारामुळे समाजात फूट पाडण्याचे काम केले जात आहे. संभळबद्दल बोलताना ते म्हणाले, मी संभळमधील हिंसाचाराचा निषेध करतो. त्या ठिकाणी चार, पाच जणांचा मृत्यू झाला. आता भारत सरकारने यासंदर्भात हस्तक्षेप करुन कायदा करावा, असे चिश्ती यांनी सांगितले. भारत आता ग्लोबल शक्ती बनत असताना या प्रकारे चीफ पब्लिसिटीचे प्रकार होत आहे.