Akal Takht on Sukhbir Singh Badal: शिख समाजाचे सर्वोच्च न्यायालय श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा दिली. त्यानुसार सुखबीर सिंग सुवर्ण मंदिरात भांडी घासणार आहे. लंगर घरात सेवा करणार आहेत. श्री दरबार साहिबच्या गेट बाहेर चौकीदारी करणार आहेत. ही शिक्षा सुखबीर सिंग यांच्यासह 17 जणांना दिली आहे. त्यामध्ये 2015 मध्ये अकाली दलाच्या सरकारमध्ये असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. या माजी मंत्र्यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा दिली आहे.
सुखबीर सिंग आणि अन्य लोकांना शिरोमणी अकाली दल सरकारने केलेल्या गुन्ह्याबाबत शिक्षा दिली आहे. त्यामध्ये डेरा प्रमुख राम रहीम यांना माफी देणे आणि इतर चार आरोपांवर शिक्षा देण्यात आली. 2015 मध्ये पवित्र पुस्तक गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याचा आरोप आहे. तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्यासारखे कपडे घालून अमृत शिंपडण्याचे नाटक केल्याचा आरोप आहे. ज्या वेळी पंजाबमध्ये हा प्रकार घडला त्यावेळी सुखबीर यांचे वडील प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री होते. सुखबीर बादल यांना 30 ऑगस्ट रोजी अकाल तख्तने तनखैया (धार्मिक दोषी) म्हटले होते. चार तास आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी अकाली तख्तने केली.
सुखबीर बादल हे दोन वेळा पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. ते 16 वर्षे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील दिवंगत प्रकाश सिंह बादल हे पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रकाशसिंग बादल यांनी एसएडीची स्थापना केली होती. तसेच प्रकाश सिंग बादल यांना 13 वर्षांपूर्वी दिलेला फख्र-ए-कौम खिताब परत घेतला आहे.
सुखबीर सिंग यांच्यासोबत 16 अन्य आरोपीत बीबी जगीर कौर, प्रेम सिंह चंदूमाजरा, विक्रम मजीठिया, सुरजीत सिंग, महेशइंदर सिंग, सर्बजीत सिंह, सोहन सिंग ठंडल, चरणजीत सिंग, आदेश प्रताप सिंग यांचे नाव आहेत. या लोकांनी सरकारचा निर्णयाचे समर्थन केले. आता या आरोपीच्या शिक्षेची अंमलबजावणी 3 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.
राम रहीम यांना माफ केल्याची जाहिरात करण्यात आली होती. आता त्या जाहिरातीचे पैसे सुखबीर बादल, बलविंदर सिंग भूदंड, दलजीत सिंग चीमा, हिरा सिंग गाबडिया व्याजासह शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला देणार आहे.