Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी कारागिरीने बनवलं खास टाळं, किंमत, वजन ऐकून व्हाल अवाक्!

| Updated on: Aug 07, 2023 | 1:47 PM

Ayodhya Ram Mandir | या टाळ्याच वजन, लांबी, रुंदी किती?. सत्य प्रकाश शर्मा असं या कारागिराच नाव आहे. हाताने बनवलेलं हे जगातील सर्वात मोठं टाळ असल्याचा त्यांचा दाव आहे.

Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी कारागिरीने बनवलं खास टाळं, किंमत, वजन ऐकून व्हाल अवाक्!
Artisan makes lock for Ayodhya Ram Mandir
Follow us on

लखनऊ : सध्या अयोध्येत वेगाने राम मंदिराच निर्माण कार्य सुरु आहे. जगभरातील कोट्यवधी राम भक्तांचे मंदिराच्या उद्घाटनाकडे डोळे लागले आहेत. अनेकांची राम मंदिरासाठी काही ना काही योगदान देण्याची इच्छा आहे. अलीगढमधल्या एका राम भक्ताने अयोध्येतील राम मंदिरासाठी एक खास टाळं बनवलं आहे. या टाळ्याच वजन, किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. सत्य प्रकाश शर्मा असं या कारागिराच नाव आहे. हाताने बनवलेलं हे जगातील सर्वात मोठं टाळ असल्याचा त्यांचा दावा आहे.

हे टाळ बनवण्यासाठी 2 लाख रुपये खर्च आला आहे. प्रभू राम चंद्रांचा त्यावर फोटो आहे. आता सत्य प्रकाश शर्मा यांची, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला हे टाळं गिफ्ट म्हणून देण्याची इच्छा आहे.

टाळ्याच वजन किती किलो?

हाताने बनवलेल्या या टाळ्याच वजन 400 किलो आहे. हे टाळं 10 फूट लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. सत्य प्रकाश शर्मा यांचा टाळ बनवण्याचा छोटासा व्यवसाय आहे. घरातूनच ते हा व्यवसाय करतात. लहानपणापासूनच मी टाळी बनवतोय, असं त्यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

हे टाळं कुठे ठेवलय?

ही एकदम वेगळी गोष्ट असल्याने राम मंदिरासाठी टाळ बनवण्याचा विचार माझ्या मनात आला. सध्या शर्मा या टाळ्यावर शेवटचा हात फिरवत असून त्यात काही छोटे-मोठे बदल करत आहेत. घराबाहेरच्या गल्लीत त्यांनी हे टाळ ठेवलय.

राम मंदिर भक्तांसाठी कधी खुलं होणार?

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, “हे लॉक स्वीकारल जाईल की, नाही? या बद्दल त्यांनी ट्रस्टमधल्या सदस्याशी बोललं पाहिजे” श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला राम भक्त वेगवेगळ्या गोष्टी पाठवत आहेत. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिर भक्तांसाठी खुल करण्याच नियोजन आहे.