नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेला सांगितले जात आहे की ती साडी घालून रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नाही. 16 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि महिला (रेस्टॉरंट कामगार) दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रेस्टॉरंटच्याच आणखी एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले की साडी परिधान करुन आत प्रवेश दिला जात नाही. आम्ही तुम्हाला स्मार्ट कॅज्युअल्सची परवानगी देत आहोत, पण तुम्हाला साडी नेसून आत जाण्याची परवानगी नाही. (Alleged ban on women wearing sarees in Delhi restaurants, video goes viral)
लेखिका शेफाली वैद्य यांनी या व्हिडिओवर टिप्पणी केली आहे. त्यांनी लिहिले, ‘साडी’ स्मार्ट वेअर ‘नाही हे कोण ठरवत आहे? मी यूएस, यूएई तसेच यूके मधील सर्वोत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी घातली आहे. मला कोणी अडवले नाही आणि कुठला एक्विला रेस्टॉरंट(aquila restaurant) भारतात साडी स्मार्ट नाही हे ठरवण्यासाठी ड्रेस कोड बनवत आहे! हे आश्चर्यकारक आहे.’
हा व्हिडिओ प्रथम 20 सप्टेंबर रोजी अपलोड करण्यात आला होता. पत्रकार अनिता चौधरी यांनी एका व्हिडिओमध्ये गृहमंत्री, दिल्ली पोलीस, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, महिला आयोग यांना टॅग केले आणि लिहिले – ‘अक्विला रेस्टॉरंटमध्ये साडीला परवानगी नाही कारण भारतीय साडी स्मार्ट पोशाख नाही. स्मार्ट वेअरची व्याख्या काय आहे? कृपया मला स्मार्ट वेअरची व्याख्या सांगा म्हणजे मी साडी घालणे थांबवू शकेन.’
या व्हिडिओवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सनातनी नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले- भारतीय पोशाख ओळखत नसलेल्या कोणत्याही संस्थेला भारतात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. या घटनेवरुन ब्रिटिश बोर्डची आठवण आली, ज्यावर लिहिले होते – ‘कुत्रे आणि भारतीयांना परवानगी नाही. आम्हाला अद्याप वसाहतींच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालेले नाही. रंजन पटेल यांनी लिहिले- दुर्दैवाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेशाचे अधिकार आहेत. ते कोणतेही स्पष्टीकरण न देता कोणालाही प्रवेश नाकारू शकतात. (Alleged ban on women wearing sarees in Delhi restaurants, video goes viral)
Who decides sari is not ‘smart wear’? I have worn sarees at the best restaurants in the US, UAE as well in UK. No one stopped me. And some Aquila Restaurant dictates a dress code in India and decides saree is not ‘smart enough’? Bizarre. pic.twitter.com/8c6Sj1RNha
— Shefali Vaidya. ?? (@ShefVaidya) September 22, 2021
इतर बातम्या
VIDEO | Trailer Out : चिरंजीवी यांनी रिलीज केला साई धरम तेजच्या ‘रिपब्लिक’ चित्रपटाचा ट्रेलर
आम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक बिनविरोध कशी करणार? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल