जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath cloudburst) गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. ही घटना काल संध्याकाळी 5.30 वाजता घडली. या दुर्घटनेनंतर (Amarnath Rain) अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. घटनास्थळी रात्रभर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी जेन-सेट आणि अलास्कन दिव्यांचा वापर केला जात गेला. अजूनही काही ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. त्याची काही दृश्य समोर आली आहेत. त्याचे अंगावर काटा आणणारे काही व्हीडिओ समोर आले आहेत.
Jammu & Kashmir | 15 dead in the Amarnath cloud burst incident. Rescue operation continues. The foot yatra has been temporarily suspended: Indian Army officials pic.twitter.com/7N5iBpftbW
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 9, 2022
अमरनाथमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. अमरनाथमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
#WATCH | Rescue operation in progress in the cloudburst-affected areas in #Amarnath, J&K
(Source: Chinar Corps- Indian Army) pic.twitter.com/bzMHNpnqCc
— ANI (@ANI) July 9, 2022
मुसळधार पावसामुळे प्रभावित बालटाल जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि इतरांनी बचाव कार्य सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी दिली आहे.
Jammu & Kashmir | 15 dead in the Amarnath cloud burst incident. Rescue operation continues. The foot yatra has been temporarily suspended: Indian Army officials pic.twitter.com/7N5iBpftbW
— ANI (@ANI) July 9, 2022
भारतीय सैन्याकडून सध्या अमरनाथ इथे बचाव कार्य सुरू आहे. अनेकाचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे.
#WATCH | Mountain Rescue Team (MRT) rescue work under progress after a cloud burst occurred in the lower reaches of the Amarnath Cave
(Source: J&K Police) pic.twitter.com/ianHJKVxFD
— ANI (@ANI) July 8, 2022
भारतीय सैन्यदल आपल्या हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांची सुटका करत आहे.
#WATCH | 6 pilgrims evacuated as part of the air rescue operation, this morning. Medical teams present at Nilagrar helipad. Mountain rescue teams & lookout patrols are in the process of searching for the missing.#AmarnathYatra
(Source: Chinar Corps, Indian Army) pic.twitter.com/NccAaPFsMt
— ANI (@ANI) July 9, 2022
देशात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. देशातील अनेक राज्यात पूरजन्य स्थिती आहे. तसेच काश्मीरमध्ये देखील मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. ढगफुटी झाल्यामुळे तिथं मोठा पूर आला आहे. पुरामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती तिथल्या पथकाने सांगितली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. पण अद्याप तिथल्या प्रशासनाने ही या माहितीला दुजोरा दिलेला नाही. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी पथकाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.