जामनगर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट सोबत होणार आहे. लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. जगभरातील व्हीव्हीआयपी लोकं या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. 1 ते 3 मार्च दरम्यान जगभरातून पाहुणे या लग्नाला येणार आहेत. या लग्नसोहळ्याला रिहाना आणि जादूगार डेव्हिड ब्लेन यांच्यासह प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकार देखील आपली कला दाखवणार आहेत. अव्वल भारतीय संगीतकार अरिजित सिंग, अजय-अतुल आणि दिलजीत दोसांझ हे देखील गाण्यांचं सादरीकरण करणार आहे. भारतातील व्हीव्हीआयपी पाहुणे ज्यामध्ये जागतिक बिझनेसमन आणि टेक्नॉलॉजी आयकॉन्स यांचा ही समावेश आहे.
भारतातून कुमार मंगलम बिर्ला, उदय कोटक, आदर पूनावाला, सुनील मित्तल, आध्यात्मिक संत सद्गुरू, सचिन तेंडुलकर, एम.एस धोनी, रोहित शर्मा, केएल राहुल, अमिताभ बच्चन, रजनीकांत या स्टार्सना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय शाहरुख खान, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, विकी कौशल आणि कतरिना कैफ तसेच माधुरी दीक्षित यांना ही आमंत्रण देण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनंत अंबानी यांनी सांगितले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वेड इन इंडिया’ आवाहनानंतर घेण्यात आलाय. याशिवाय त्यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला आणि आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांचा व्यवसायही तेथून सुरू झालाय. अनंत अंबानी म्हणाले की, ‘मी येथे मोठा झालो आहे आणि हे माझे नशीब आहे की आम्ही येथे सेलिब्रेशनचे करु शकत आहोत. हे माझ्या आजीचे जन्मस्थान आणि माझ्या आजोबा आणि वडिलांचे कार्यस्थान आहे. भारतात प्रत्येकाने लग्न केले पाहिजे आणि हे माझे घर आहे असे आपले पंतप्रधान म्हणाले तेव्हा ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
अनंत अंबानी यांनी सांगितले की, ‘माझे वडील अनेकदा सांगतात की, हे माझ्या आजोबांचे सासरचे घर आहे आणि त्यामुळेच आम्ही येथे उत्सव साजरा करत आहोत. मी जामनगरचा आहे, मी या ठिकाणचा नागरिक आहे, असा माझा विश्वास आहे.’ तीन दिवसीय महोत्सवासाठी सर्व पाहुणे 1 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत मुंबई किंवा दिल्लीहून चार्टर्ड फ्लाइटने जामनगरला पोहोचणार आहेत.