पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनीच!, सोनिया गांधींचं शिक्कामोर्तब; पण सोनी यांचा नकार

| Updated on: Sep 19, 2021 | 10:43 AM

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Ambika soni to be new punjab chief minister, sonia gandhi approved her name for cm)

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनीच!, सोनिया गांधींचं शिक्कामोर्तब; पण सोनी यांचा नकार
ambika soni
Follow us on

चंदीगड: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच आज होणारी पंजाबमधील काँग्रेसच्या आमदारांची बैठकही रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, सोनी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (Ambika soni to be new punjab chief minister, sonia gandhi approved her name for cm)

हायकमांडच्या आदेशानंतर अंबिका सोनी चंदीगडला येत आहेत. त्यांना घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचं हेलिकॉप्टर रवाना झालं आहे. त्यामुळे सोनी याच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बैठक रद्द

आज 11 वाजता आमदारांची बैठक होती. मात्र, सिद्धू समर्थक या बैठकीत सिद्धू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असल्याने हायकमांडने ही बैठकच रद्द केली आहे. सिद्धू गटाने डोकं वर काढू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सिद्धू यांना त्यांच्या समर्थकांना शांत करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सोनींचा नकार

दरम्यान, आरोग्याचं कारण पुढे करत अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.

गटबाजी रोखण्यासाठी निर्णय

सूत्रांच्या मते अंबिका सोनी यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. अंबिका सोनी या सोनिया गांधी यांच्या अंत्यत जवळच्या समजल्या जातात. त्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच अंबिका सोनी यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच सोनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय सोनी या हिंदू खत्री असल्यानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. अंबिका सोनी मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Ambika soni to be new punjab chief minister, sonia gandhi approved her name for cm)

 

संबंधित बातम्या:

पंजाबसाठी मोठा दिवस, काँग्रेसचं मुख्यमंत्रीपदाचं नाव जवळपास निश्चित, सत्तेचा फॉर्म्युलाही ठरला, सिद्धूंचं काय होणार?

कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर

क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

(Ambika soni to be new punjab chief minister, sonia gandhi approved her name for cm)