नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात जगभरात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ (Ray Dalio) यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. जगभरात भारताचा विकास दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात चांगला असणार आहे, असे वक्तव्य रे डॅलिओ यांनी केले आहे. दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान ते बोलत होते. सरकार आणि बदलते जग या सत्रात त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. डॅलियो ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक आहेत.
India will have the greatest growth rate and the greatest transformation of all countries: @RayDalio, founder of Bridgewater Associates @FinMinIndia @WorldGovSummit pic.twitter.com/ZbBmXt6Nwt
हे सुद्धा वाचा— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) February 16, 2023
युद्धापासून दूर राहणार्या देशांना फायदा
डॅलियो पुढे म्हणाले की, भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. मागील दहा वर्षांपासून मी अभ्यास करत आहे. त्यानुसार आपण जे पाहत आहोत, त्यात भारताचा विकास दर सर्वाधिक आणि वेगवान असणार आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत देशात सर्वात मोठा बदल होणार आहे.
जागतिक राजकारणात भारत हा निष्पक्ष देश आहे. भारताच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार आहे. जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक असणार आहे. युएईचे कॅबिनेट मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गेर्गावी यांच्याशी बोलताना ते म्हणाले जे देश युद्धापासून दूर राहतील त्यांना फायदा होईल.
भारताची परिस्थिती चांगली
अमेरिकन अब्जाधीश डॅलियो पुढे म्हणाले की, भारताची परिस्थिती खूपच चांगली आहे. येथे व्यवसायासाठी खूप चांगले आणि सोपे वातावरण नाही, परंतु त्यात बदल होईल. युरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हे पर्यटन आणि येथील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी चांगले ठिकाण आहे.
अर्थसंकल्पात काय म्हटले होते
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यात भरताचा विकास दर ६.५ टक्के असेल असे नमूद केले आहे. यापूर्वी, आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनी भारत अनेक वर्षांपर्यंत नऊ टक्के आर्थिक विकास दर गाठू शकतो, असे म्हटले आहे.