Richest IAS Officer Amit Kataria: आयएएस टीना डाबी, आयपीएस अमित लोढा यांच्यासारखे अधिकारी नेहमी चर्चेत असतात. या यादीत आयएएस अमित कटारिया यांचे नाव आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत आयएएस अधिकारी आहे. ते पगार केवळ एक रुपया घेतात. त्यानंतर त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. हरियाणामधील गुरुग्राममध्ये राहणारे आयएएस अमित कटारिया सध्या छत्तीसगडमध्ये कार्यरत आहेत. ते गेल्या सात वर्षांपासून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहे.
आयएएस अमित कटारिया छत्तीसगडमधील बस्तरमध्ये जिल्हाधिकारी असताना चर्चेत आले होते. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना त्यांनी काळा चष्मा घातला होता. ते सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली होती.
आयएएस अमित कटारिया देशातील टॉप 10 श्रीमंत अधिकारीच्या यादीत आहे. त्यांनी 2003 मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. त्यांना 18 रँक मिळाली होती. त्यानंतर त्यांना छत्तीसगड केडर मिळाले होते. त्यांचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झाले. आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेक केले.
अमित कटारिया यांचा परिवार उद्योगात आहे. त्यांचा रिअल एस्टेट आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि जवळपास पसरलेला आहे. त्यांच्या परिवाराचे सदस्य हा व्यवसाय चालवतात. रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती आठ कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये त्यांचा एकूण पगार 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त होता. परंतु ते केवळ एक रुपया घेतात. ते म्हणतात, मी नोकरीत आलो तेव्हाच ठरवले होते. माझी ही नोकरी देशसेवेसाठी आहे. मी केवळ एक रुपया पगार घेणार आहे.
आयएएस अमित कटारिया यांची पत्नी अस्मिता हांडा कमर्शियल पायलट आहे. त्यांचा पगारही लाखोंमध्ये आहे. आयएएस अमित कटारिया सोशल मीडियावर नेहमी त्यांचे पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना फिरण्याची चांगली आवड आहे.