काँग्रेस बाबासाहेब विरोधी आहे. काँग्रेस आरक्षण विरोधी आहे. काँग्रेस सावकरविरोधी आहे. या सर्वांचे उत्तर काँग्रेसकडे नाही. यामुळे काँग्रेस आता संभ्रम निर्माण करत आहे. माझे पूर्ण वक्तव्य राज्यसभेच्या रेकॉर्डवर आहे. मी किंवा माझा पक्ष स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करु शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचा अपमान केला. त्यांच्या सिद्धांतांचा विरोध केला आहे. त्यांना भारतरत्न दिला नाही. ते बाबासाहेबांच्या नावावर आता संभ्रम निर्माण केले. ते आपल्या जुन्या नितीवर आले. त्यांनी माझे वक्तव्याचे विपर्यास करत जनतेपर्यंत नेला आहे. संपूर्ण देश बाबासाहेबांच्या संदर्भात आदर व्यक्त करतो. मी काँग्रेसच्या या प्रयत्नाचा निषेध करतो. काँग्रेसच्या या मोहिमेच्या विरोधात काय कायदेशीर कारवाई करता येईल, त्याचा विचार आम्ही करणार आहोत, असे भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने नेहमी विरोध केला आहे, त्यावर संसदेत चर्चा होत होती. त्यांनी निवडणुकीत बाबासाहेब यांना पराभूत करण्यासाठी कोणतीही कसर दोन वेळा सोडली नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसने आपल्याच नेत्यांना भारतरत्न दिला. १९९० मध्ये बाबासाहेबांना भाजपच्या समर्थानाने आलेल्या सरकारने दिला.
पंडित नेहरु यांनीही बाबासाहेबांना नेहमी विरोध केला. बाबासाहेबांचे स्मारक बनवण्यास काँग्रेसने नकार दिला. परंतु काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे स्मारक काँग्रेसने केले होते. काँग्रेस सरकार असताना बाबासाहेबांचे मोठे स्मारक झाले नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.
बाबासाहेब कलम ३७० च्या विरोधात होते. आरक्षणाला अधिक मजबूत करण्याचे काम भाजपने केले. मंडल आयोगाचे अहवाल इंदिरा गांधी यांनी तो रिपोर्ट स्वीकारला नाही. १९९० मध्ये गैर काँग्रेस सरकार आल्यानंतर मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारण्यात आले, असे अमित शाह यांनी म्हटले.