भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण राज्यातील सत्तारुढ पक्षाने आतापासूनच आपल्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. पार्टीने सर्वप्रथम हरलेल्या 39 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. भाजपाने रविवारी “बृहद प्रदेश कार्यसमिती” बैठक ग्वालियरमध्ये बोलवली आहे. भाजपाने राज्यातील निवडणूक प्रचारावर भर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या बैठकीत निवडणूक रणनिती आणि रोडमॅप तयार करतील.
पक्षाच्या 1200 नेत्यांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी बोलावलं आहे. एकूण 20 श्रेणीतील नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पहिल्यांदा खास पद्धतीची बैठक बोलवण्यात आली आहे. प्रदेशातील सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांना एकाच मंचावर अमित शाह यांनी बोलावलं आहे. प्रदेश कार्यसमितीचे सर्व सदस्य, राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदार, सर्व आमदार, सर्व महापौर आणि सर्व नगर निगमच्या अध्यक्षांमना आमंत्रित करण्यात आलं आहे.
या बैठकीला कोण येणार?
त्याशिवाय मध्य प्रदेशातील सर्व जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा बैठकीत सहभागी होतील. प्रदेशातील सर्व निगम मंडल आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांना बैठकीसाठी बोलावलं आहे. पार्टीचे सर्व जिल्हा प्रभारी आणि जिल्हा अध्यक्ष या बैठकीला येतील.
सलग चौथ्यांदा सत्तेची संधी हुकली
रविवारी सकाळी 10.30 वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृह, जीवाजी विश्वविद्यालय, ग्वालियरमध्ये ही बैठक बोलावली आहे. बैठकीत दुपारनंतर गृहमंत्री अमित शाह बैठकीत सहभागी होतील. भाजपाची सलग 15 वर्ष राज्यात सत्ता होती. चौथ्यांदा पूर्ण बहुमत मिळालं नाही. कमलनाथ यांचं सरकार काही महिने सत्तेत होतं. नंतर पुन्हा भाजपाच सरकार सत्तेवर आलं.
भाजपाचा किती जागा जिंकण्याच लक्ष्य?
भाजपाने पुन्हा एकदा 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. 51 टक्के व्होट मिळवण्याचा इरादा आहे. राज्यात 230 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 116 जागांवर विजय आवश्यक आहे.