देशातील सीबीआयने इंटरपोलच्या धर्तीवर सुरु केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या ‘भारतपोल’ पोर्टलमुळे राज्य पोलीस दले आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीना इंटरपोलच्याद्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सुविधा मिळणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा इंटरपोलशी संबंधित प्रकरणांना जबाबदार राहणार आहे.
सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाईन कट्टरता, संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करी यांच्यासह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची वाढती संख्येमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने आणि वास्तविक वेळेत होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठी या प्रकारच्या पोर्टलची आवश्यकता होती. या वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीबीआयने हे भारतपोर्टल विकसित केले आङे. याच्या अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली असून ती अतिशय सुलभ आहे. ही वेबसाईट सर्व तपास यंत्रणांना एकत्र व्यासपीठ मिळवून देणार आहे.
भारतात इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या ( एनसीबी-नवी दिल्ली ) रुपात सीबीआय,इतर कायदे अंमलबजावणी एजन्सींसह देशभरातील विभिन्न एजन्सींचा एकत्र मिळून गुन्ह्यांच्या प्रकरणांत आंतरराष्ट्रीय मदतीची सुविधा प्रदान करणार आहे. भारतपोल लाँच झाल्यानंतर देशातील सर्व पोलिस यंत्रणा आणि तपास एजन्सींना त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे. भारतपोल हे पोर्टल देशाला इन्व्हेस्टीगेशनच्या नव्या युगात घेऊन जाईल असे भारतपोल पोर्टल लाँच करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
एकमेकांना जोडणे –
देशातील इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या रुपात सीबीआयला इंटरपोल संपर्क अधिकारी तसेच युनिट अधिकाऱ्यांना सामील करुन देशातील सर्व तपास यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणणार
इंटरपोल नोटीस –
कोणत्याही आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या प्रकरणात इंटरपोलला वेगाने नोटीस पाठवता येणार आहे. तसे हे पोर्टल सुरक्षित आणि संरचित असेल. हे जगभरातील सर्व गुन्हे तपास एजन्सींना एक जागतिक माहिती देवाण घेवाणाचे व्यासपीठ असणार आहे.
इंटरपोल संदर्भ –
इंटरपोल चॅनलद्वारे १९५ देशांशी गुन्ह्यांच्या प्रकरण आणि परदेशातील तपासासाठी भारतीय गुन्हे तपास यंत्रणांना त्वारित आंतरराष्ट्रीय मदतीची सुविधा प्रदान होणार आहे.
माहितीचे प्रसारण –
195 देशांकडून मदतीसाठी विनंती किंवा त्यांच्याद्वारे केलेली गुन्हेगारी गुप्तचर कारवाई किंवा माहिती भारतीय कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना मिळणार आहे.
संसाधन –
गुन्ह्यांसंबंधित कागदपत्रांची देवाण-घेवाण आणि तपास यंत्रणांच्या क्षमतेत वाढ करणे, तपास यंत्रणांच्या यशाच्या कहाण्या आणि नवे घटनाक्रमांना प्रदर्शित करण्यासाठी ‘भारतपोल’ एक महत्वाची विंडोच्या म्हणून काम करेल.