अयोध्या, दि. 10 फेब्रुवारी 2024 | अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यानंतर अयोध्येत देशभरातून नाही तर जगभरातून भाविक येऊ लागले आहेत. अयोध्या आता देशाचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र होऊ लागले आहे. सुपरस्टार अभिषेक बच्चन 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आले होते. त्यानंतर आता पुन्हा अमिताभ बच्चन अयोध्येत आले. त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. जय श्रीरामचा नाराही लावला. रामलल्लाच्या भक्तीत बिग-बी लिन झाल्याचे दिसले. अमिताभ बच्चन येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासंदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे.
अमिताभ बच्चन 22 जानेवारी रोजी अयोध्येत आले होते. आता पुन्हा आले. यावर बोलताना ते म्हणाले, आता अयोध्येत येणे-जाणे सुरुच राहणार आहे. आम्ही प्रयागराज (पूर्वीचे इलाहाबाद) राहिलो. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत राहिलो. परंतु लोक म्हणतात, तुम्ही कोठेही राहिले तरी उत्तर प्रदेशचे आहात. त्यावर बाबूजी (अमिताभ यांचे वडील) म्हटत होते, ‘हाथी घूमे गांव-गांव जेके हाथी ओके नाव.. ‘ हे खरे आहे. आम्ही कुठेही राहिलो तरी म्हटले जाते, छोरा गंगा किनारे वाला.’ दरम्यान अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, आस्था ने फिर बुलाया, और खींचे चले गये हम…
T 4916 – जय श्री राम 🚩
आस्था ने फिर बुलाया, और खींचे चले गये हम pic.twitter.com/FoqCdG5zIb— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2024
अयोध्येत राम मंदिरात पूजा केल्यानंतर अमिताभ बच्चन सरळ अयोध्या मंडळचे आयुक्त गौरव दयाल यांच्या घरी गेले. दयाल यांची अमिताभ यांनी भेट का घेतली? याची माहिती मिळाली नाही. परंतु बराच वेळ अमिताभ बच्चन त्या ठिकाणी होते. अमिताभ बच्चन यांनी नुकतीच अयोध्येत मंदिराजवळ जागाही घेतली आहे. बई स्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL)’ यांच्या द्वारे अयोध्येत 7 स्टार एन्क्लेव्ह, द शरयू येथे एक प्लॉट विकत घेतला आहे. 14.5 कोटी रुपयांचा भूखंड आहे. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता एका ज्वेलरी ब्रँडचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांनी केले.
#WATCH अयोध्या, उत्तर प्रदेश: अभिनेता अमिताभ बच्चन श्री राम मंदिर से दर्शन के बाद रवाना हुए।
(सोर्स: राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट) pic.twitter.com/QI2Sg889Wt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 9, 2024
अमिताभ बच्चन ज्वेलरी ब्रँडचे उद्घाटन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी व्यासपीठावरुन ‘होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा..’ हे गाणे ज्वेलरीच्या संचालकांनी म्हटले. अमिताभ बच्चन यांनी जय श्रीराम म्हणत त्याला प्रतिसाद दिला.