नवी दिल्ली, दि. 8 जानेवारी 2024 | देशात सर्वात वेगाने बदल रेल्वे मंत्रालयात सुरु आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण सुरु आहे. रेल्वेने कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आणली आहे. ही रेल्वे कमालीची लोकप्रिय झाली आहे. परंतु या रेल्वेचे भाडे एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेन आणली आहे. देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला सुरुवात अयोध्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. रेल्वे प्रवाशांसाठी ही रेल्वे म्हणजे ‘अमृत’ म्हटली जात आहे. या रेल्वेत अनेक प्रकारच्या सुट मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना नवीन रेल्वे उपलब्ध करुन दिली आहे. अमृत भारत नावाने धावणाऱ्या या एक्स्प्रेसचा वेग 130 किमी प्रती आहे. या रेल्वेमध्ये अनेक सुविधा वंदे भारत सारख्या आहेत. तिला दोन्ही बाजूला पॉवरफुल इंजिन आहे. यामुळे कमी वेळात तुमचा प्रवास पूर्ण होणार आहे. या ट्रेनच्या कोचची डिझाइन अशा पद्धतीने केली आहे की, प्रवाशांना धक्के बसणार नाही. या ट्रेनमध्ये एकूण 22 कोच आहेत.
अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट इतर एक्स्प्रेसपेक्षा कमी आहे. या रेल्वेचे तिकीटच कमी नाही तर नवीन सुटही प्रवाशांना दिली आहे. या रेल्वेत ‘सुपरफास्ट चार्जेज’ लागणार नाही. प्रवाशांना ‘सुपरफास्ट चार्जेज’ म्हणून 30 ते 45 रुपये द्यावे लागतात. परंतु अमृत भारतमधून जाताना ‘सुपरफास्ट चार्जेज’ची सुट दिली आहे.
देशात दरवर्षी 400 अमृत भारत एक्स्प्रेस येणार आहे. देशातील रेल्वे ट्रॅक सेमीहायस्पीड रेल्वेला अनुकूल केले जात आहेत. मागील 9.5 वर्षांत रेल्वेने 26 हजार किलोमीटर ट्रॅक वाढले आहेत. तसेच सरकारने 30,749 कोटी रुपये खर्च करुन रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण केले आहे. देशातील 400 रेल्वे स्टेशन पूर्ण बदलले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अमृत भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी आहे. सुविधा मात्र वंदे भारत ट्रेनसारख्या आहेत. या रेल्वेत बाहेरचा गोंधळ आणि हवेचाही त्रास होत नाही.