देव देवतांवर आक्षेपार्ह लिखानामुळे प्राध्यापकानं नोकरी गमावली; अलिगड विद्यापीठ चर्चेत

| Updated on: Apr 07, 2022 | 1:26 AM

डॉ निशांत शर्मा यांच्या मते विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय आणि त्यांना माहिती असल्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर ते सादरीकरण करु शकणार नाहीत. त्याशिवाय ते वर्गात शिकवणार नाहीत त्यामुळे विभागप्रमुख आणि सहायक प्राध्यापकावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

देव देवतांवर आक्षेपार्ह लिखानामुळे प्राध्यापकानं नोकरी गमावली; अलिगड विद्यापीठ चर्चेत
अलिगड विद्यापीठातील प्राध्यापक निलंबित
Image Credit source: TV9
Follow us on

अलिगडः अलिगड मुस्लिम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) सहायक प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांनी लैंगिक आरोपांसंबंधता वर्गात हिंदू देव-देवतांचा उल्लेख केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून याप्रकरणी एएमयूने निलंबित केले आहे. मात्र, प्राध्यापकांनी लेखी माफी मागितली होती. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रकरणात डॉ. जितेंद्र (Dr. Jitendra) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद (Crime record) करण्यात आल्यानंतर सहायक प्रा.डॉ. जितेंद्र यांनी माफीनाम्यात लिहिले आहे की, त्यांच्या माझ्या शिकवणीचा उद्देश धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता तर बलात्कार हा समाजाचा एक भाग असल्याचे स्पष्ट करणे हा होता.

त्यांच्या या वक्तव्यानंतर व याप्रकरणी वाद वाढल्यानंतर बुधवारी एएमयूने सहाय्यक प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या

सहायक प्रा. डॉ. जितेंद्र कुमार यांनी आपले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करताना धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे काही मुद्दे त्यामध्ये दाखवले होते. त्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याचा असे सांगत त्यांचा फोटो त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या वक्तव्यानंतर डॉ. जितेंद्र कुमार यांना विद्यापीठ प्रशासनाने कारणे दाखवा असे नोटीस पाठवण्यात आले, आणि 24 तासात त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले.

तात्काळ कारवाई

एएमयू प्रॉक्टर डॉ. वसीम अली यांनी सांगितले की व्याख्यानादरम्यान, फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र यांनी वर्गातील विद्यार्थ्यांसमोर काही आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखवतील असे काही मुद्दे मांडण्यात आले होते. त्यानंतर कुलगुरू तारिक मन्सूर यांनी स्वत: या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई केली जाईल असे अश्वासन दिले होते..

भाजप नेत्याकडून प्राध्यापकाविरोधात तक्रार

एएमयूचे माजी विद्यार्थी आणि भाजप नेते डॉ निशांत शर्मा यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. जितेंद्र यांनी हिंदू देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. बलात्काराच्या घटनेबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात विभागप्रमुखांसह सहाय्यक प्राध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

…म्हणून विभागप्रमुखांवर कारवाई

डॉ निशांत शर्मा यांच्या मते विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय आणि त्यांना माहिती असल्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर ते सादरीकरण करु शकणार नाहीत. त्याशिवाय ते वर्गात शिकवणार नाहीत त्यामुळे विभागप्रमुख आणि सहायक प्राध्यापकावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

संबंधित बातम्या

शरद पवारांनी घेतलेल्या मोदींच्या तिसऱ्या भेटीचं टायमिंग आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न!

TOP 9 | विशेष बातम्या : अवकाळी पावसानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बेहाल, वाचा टॉप 9 घडामोडी

Supreme Court : कुठल्याही योजनांच्या घोषणा करण्याआधी बजेट विचारात घ्या; सुप्रीम कोर्टाचा सरकारांना सल्ला