जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, लष्कराचा एक कॅप्टन शहीद

| Updated on: Nov 22, 2023 | 6:05 PM

J & K Encounter : जंगलात दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळताच लष्कराचे विशेष दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरु केली. या दरम्यान झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एक कॅप्शन शहीद झाले आहेत. आणखी ३ जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, लष्कराचा एक कॅप्टन शहीद
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवादी असल्याची माहिती मिळताच लष्कराचे विशेष दल आणि पोलिसांनी या भागाला घेरले. यानंतर चकमक सुरु झाली.

राजौरी जिल्ह्यातील जंगलात भीषण चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधल तहसीलच्या गुलेर-बेहरोटे भागात लष्कर, पोलीस आणि CRPF यांची संयुक्त कारवाई सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल जंगलात गेल्या काही वर्षांत अनेक चकमकी झाल्या आहेत. सुरक्षा दलांसाठी हे आव्हान बनले आहेत. भौगोलिक स्थितीचा फायदा घेत दहशतवादी लपण्यासाठी घनदाट जंगलांचा वापर करतात.

गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.