अनंत अंबानी यांच्या लग्नाला अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख लावणार उपस्थिती?

| Updated on: Feb 24, 2024 | 9:12 PM

Anant Ambani's wedding : मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाह बंधणात अडकणार आहे. यासाठी जामनगरमध्ये त्यांच्या घरी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या विवाह सोहळ्याला देश विदेशातील अनेक मोठी लोकं हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागले आहे.

अनंत अंबानी यांच्या लग्नाला अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख लावणार उपस्थिती?
Follow us on

Ambani Family : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लवकरच विवाह होणार आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय विवाह सोहळ्यात अनेक कार्यक्रम होणार आहेत. १ ते ३ मार्च या कालावधीत हो सोहळा पार पडणार असून त्यासाठी अंबानी यांच्या घराला सजवले जाणार आहे.

लग्नासाठी खास ड्रेस कोड

या सोहळ्याची सुरुवात पहिल्या दिवशी ॲन इव्हनिंग इन एव्हरलँडने होईल. म्हणजेच ज्याचा ड्रेस कोड ‘एलिगंट कॉकटेल’ म्हणून सेट करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी ‘जंगल फिव्हर’ या ड्रेस कोडसह अ वॉक ऑन द वाइल्डसाइडचे आयोजन केले जाईल. जामनगर येथील अंबानींच्या प्राणी बचाव केंद्रात बाहेर त्याचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.

या कंपन्यांची प्रमुख राहणार उपस्थित

शेवटच्या दिवशीही दोन कार्यक्रम होणार आहेत. प्रथम, टस्कर ट्रेल्स, ज्यासाठी ‘कॅज्युअल चिक’ पोशाख सुचवले आहे कारण पाहुण्यांनी जामनगरच्या हिरव्यागार परिसरात अधिक वेळ घालवणे अपेक्षित आहे. अंतिम पार्टीला हेरिटेज भारतीय पोशाख असलेली एक सुंदर संध्याकाळ साजरी होणार आहे. वृत्तानुसार, या कार्यक्रमाला मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, मॉर्गन स्टॅनलीचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ॲडनॉकचे सीईओ सुलतान अहमद अल जाबेर आणि ईएल रॉथस्चाइल्डचे अध्यक्ष लिन. फॉरेस्टर डी रॉथस्चाइल्ड उपस्थित राहणार आहेत.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी देखील खास आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे तीन दिवसासाठी तीन वेगवेगळा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

अनेक मोठे नेते राहणार उपस्थित

G20 बैठक सुरु असताना अंबानी कुटुंबात हा विवाह पार पडणार आहे. त्यामुळे भारतातील व्हीआयपी लोकं येणार आहेत. मुकेश अंबानी हे जागतिक उद्योगपती आहेत. त्यामुळेच त्यांच्या या मुलाच्या लग्नाला अनेक मोठे नेते हजर राहणार आहेत. अतिथींच्या यादीमध्ये राज्य प्रमुख आणि माजी राष्ट्रप्रमुख तसेच जागतिक व्यवसायातील सर्वात मोठी नावे येणार आहेत. ज्यापैकी बरेच जण रिलायन्सचे व्यावसायिक भागीदार नाहीत.