नवी दिल्ली : राजस्थानच्या भिवाडीमधून पाकिस्तानात गेलेली अंजू चर्चेचा विषय बनली आहे. फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात निघून गेली. आता अंजूच्या परतण्याबद्दल महत्वाची अपडेट आहे. अंजू आपल्या मुली बरोबर बोलली. तिने 1-2 दिवसात भारतात परतणार असल्याच सांगितलं आहे.
पाकिस्तानातील सीमा हैदरप्रमाणे अंजूला सुद्धा ऑनलाइन प्रेम झालं. त्यासाठी ती देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली. राजस्थानच्या भिवाडीत राहणारी अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तनूवा प्रांतामध्ये पोहोचली.
अंजू फोनवरुन मुलीसोबत बोलली
सोमवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, अंजू सकाळी व्हॉट्स App कॉलवरुन आपल्या मुलीसोबत बोलली. अंजूने एक-दोन दिवसात भारतात परतण्याच आश्वासन दिलं आहे. अंजू व्हॉट्सएपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. परतणार असल्यामुळे तिच्या कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला आहे.
अंजूच्या नवऱ्याने काय सांगितलं?
“माझ्या पत्नीने मला जयपूरला जाण्याविषयी माहिती दिली होती. पण नंतर तिने व्हॉइस नोट पाठवून लाहोरमध्ये असल्याच सांगितलं. अंजू लाहोरला कशी पोहोचली? याविषयी मला काही माहित नाही. तिला व्हिसा कसा मिळाला? याची कल्पना नाही” असं अंजूच्या नवऱ्याने सांगितलं.
नवरा अंजूसोबत राहणार की नाही?
“हे सीमासारख प्रकरण नाहीय.कारण माझ्या पत्नीकडे सगळे कागद आहेत. मी माझ्या पत्नीचा फोन पाहत नाही. तिने 2-3 दिवसात परतणार असल्याच सांगितलं आहे. त्यामुळे मी कुठलीही तक्रार केलेली नाही. आता अंजू सोबत रहायच की, नाही हे मुलं ठरवतील. कारण या सगळ्यामध्ये तिने चीटिंग केलीय. जर तिच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्र असतील, तर तिला भारतात येऊ द्या असं मी सरकारला आवाहन करीन” असं अंजूचा नवरा म्हणाला.
सीमा हैदर सारख प्रकरण
भारतात सध्या सीमा हैदरच प्रकरण चर्चेत आहे. पाकिस्तानात राहणारी सीमा हैदर नोएडात राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात पडली. पाकिस्तानातून पळून तिने थेट भारत गाठलं. सीमाला अटक करण्यात आली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. हे प्रकरण अजून थंड झालेलं नाही. कारण यूपी एटीएसने सातत्याने सचिन आणि सीमाच्या संपर्कात आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. सीमा हैदरच्या विषयात हेरगिरीचा अँगल आहे.