राम मंदिर पूर्ण होण्यासाठी लागणार 1800 कोटी? प्राणप्रतिष्ठा समारंभाची वर्षपूर्तीची जोरदार तयारी

| Updated on: Nov 25, 2024 | 12:42 PM

Ram Mandir Ayodhya: 22 जानेवारी 2025 रोजी अयोध्येत निर्माण करण्यात आलेल्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठेस एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मंदिरास भव्य रुप देण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर राम दरबारची मूर्ती लावण्यात येणार आहे. मंदिरातील मूर्त्यांवर रामायणातील प्रसंग दिसून येत आहे. 

राम मंदिर पूर्ण होण्यासाठी लागणार 1800 कोटी? प्राणप्रतिष्ठा समारंभाची वर्षपूर्तीची जोरदार तयारी
Ram Mandir
Follow us on

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा यावर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. 22 जानेवारी रोजी झालेल्या या समारंभाची दोन महिन्यात वर्षपूर्ती होणार आहे. त्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसचे अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी 1800 कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याची शक्यता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली. मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या निर्मितीसाठी 800 कोटी रुपये लागले होते. आता दुसऱ्या मजल्याची निर्मिती आणि राम मंदिरास भव्य स्वरुप देण्यासाठी 900 ते 1000 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

22 जानेवारी 2025 रोजी अयोध्येत निर्माण करण्यात आलेल्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठेस एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मंदिरास भव्य रुप देण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर राम दरबारची मूर्ती लावण्यात येणार आहे. मंदिरातील मूर्त्यांवर रामायणातील प्रसंग दिसून येत आहे.

निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे दुसरा मजल्याचे काम 22 जानेवारी पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिराचे काम करणाऱ्या एलएनटी कंपनीसोबतही चर्चा झाली आहे. पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करण्यासाठी रोज 1500 कामगार काम करत होते. परंतु आता कामगारांची संख्या कमी झाली आहे. जोपर्यंत कामगारांची संख्या वाढणार नाही, तोपर्यंत कामास वेग येणार नाही, असे मिश्र यांनी एलएनटीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

हे सुद्धा वाचा

मंदिराचे काम कधी पूर्ण होणार

मंदिराचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योजनेवर काम सुरु आहे. राम दरबारात मूर्ती स्थापन करण्याचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. मंदिराचा कळस निर्माण करण्याचे काम या महिन्यातच पूर्ण होणार आहे. मंदिराच्या शिखरावर दगड लावण्याचे काम सोडून इतर कामे पूर्ण होतील. या ठिकाणी 55 हजार क्यूबीक फूटापर्यंत दगड लावणे बाकी आहे.