मदरशांमध्ये राष्ट्रगीताचा निर्णय उ. प्रदेश मदरशा शिक्षण परिषदेच्या बैठकीत २४ मार्च रोजी घेण्यात आला होता. गुरुवारी हा आदेश जारी करण्यात आला. पुढील शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये मदरशे सुरु झाल्यानंतर, हे राष्ट्रगीत दररोज होणार आहे.
National anthem in Madrasa
Image Credit source: social media
Follow us on
लखनौ – उ. प्रदेशात (Uttar Pradesh)मदरशांत राष्ट्रगीत (National Anthem)म्हणणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उ. प्रदेश सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यात उ. प्रदेश मदरशा (Madrasa board)शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विना अनुदानित सर्वच मदरशांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मदरशांतील वर्ग सुरु करण्यापूर्वी सकाळी प्रार्थनेच्यावेळी राष्ट्रगीत होणार आहे. रमजान आणि ईदच्या सुट्टीनंतर गुरुवारी राज्यातील सर्व मदरशे सुरु झाले आहेत. १४ मे पासून मदरशांमध्ये बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे.
Uttar Pradesh Madrasa Education Board Council has made singing of National Anthem mandatory at madrasas before the start of classes.
मदरशांमध्ये राष्ट्रगीताचा निर्णय उ. प्रदेश मदरशा शिक्षण परिषदेच्या बैठकीत २४ मार्च रोजी घेण्यात आला होता. गुरुवारी हा आदेश जारी करण्यात आला. पुढील शैक्षणिक सत्र २०२२–२३ मध्ये मदरशे सुरु झाल्यानंतर, हे राष्ट्रगीत दररोज होणार आहे. मदरशा बोर्डांच्या परीक्षा सुरु होणार असल्याने हा निर्णय जारी करण्यात आला आहे.
१४ ते २३ मे मदरशा बोर्डाची परीक्षा
यूपीत मदरशा बोर्डाची परीक्षा १४ ते २३ मे या कालावधीत होणार आहे. यावर्षी १ लाख ६२ हजार ६३१ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. अरबी, फारसीची परीक्षा १४ मे पासून सुरु होणार आहे. यात परीक्षा सकाळी ८ ते ११ तर सिनियर सेकंडरी बोर्डाची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे.
लाऊडस्पीकरनंतर दुसरा निर्णय
काही दिवसांपूर्वी राज्यातील मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी घेतला होता. यात राज्यातील एक लाख लाऊडस्पीकर हटवण्यात आल्याची माहिती त्यांनीच यापूर्वी दिली आहे. काशी विश्वनाथ, मथुरा या मंदिरावरील भोंगेही हटवण्यात आल्याने, त्या परिसरातील मशिदींवरील भोंगेही काढण्यात आले आहेत.
प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात योगी आदित्यनाथ
दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून आल्यानंतर, योगी आदित्यनाथ हे त्यांची बुलडोझर मॅन ही प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. य़ातून राज्यातील सर्वधर्मियांना सोबत घेून, विकासाचे राजकारण ते येत्या काळात करु इच्छितात, अशी चर्चा आहे. विकासाचे राजकारण केल्यास त्यांचा दिल्लीचा मार्ग पुढच्या काळात प्रशस्त होईल असे मानण्यात येत आहे. आगामी काळात भाजपाच्या केंद्रीय राजकारणात योगींचे स्थान महत्त्वाचे असेल असे मानण्यात येते आहे.