नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी शनिवारी राजकारणातून सन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे.त्यांनी पक्ष नेतृत्वाला राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून ते त्यांच्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकतील. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत. त्यांच्यानंतर आणखी एका भाजप खासदाराने संन्यास घेतला आहे.
झारखंडमधील हजारीबागमधून भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी देखील राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. जयंत सिन्हा यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपने अजून आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आज संध्याकाळी ६ वाजता भाजपची पत्रकार परिषद आहे. यादरम्यान भाजपली पहिली यादी जाहीर होऊ शकते.
गौतम गंभीर यांच्यानंतर निवडणूक लढवण्यास नकार देणारे ते जयंत सिन्हा हे दुसरे भाजप खासदार आहेत. ते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. जयंत सिन्हा हे देखील मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ राज्यमंत्री राहिले आहेत.
गौतम गंभीरने देखील संन्यास घेतला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले, “मी पक्षाध्यक्ष जे.पी. यांना पत्र लिहिले आहे. नड्डा यांनी मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त केले जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुका भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकल्या होत्या. आता देखील भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2001 ते 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2014 ला त्यांनी वाराणसी आणि वडोदरा येथून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर त्यांनी वडोदरा येथून राजीनामा दिला. आता ते तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत.
दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील पंतप्रधान मोदींचे ते सर्वात विश्वासू सहकारी आहेत. भाजपची रणनीती आखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.