VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता

| Updated on: Dec 08, 2021 | 3:56 PM

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावतही पत्नीसह प्रवास करत होते.

VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता
Army helicopter Crash
Follow us on

चेन्नई: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला (Army Chopper Crash) आज दुपारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावतही (Bipin Rawat) पत्नीसह प्रवास करत होते. तेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच हेलिकॉप्टरने पेट घेतला. ज्या झाडांवर हेलिकॉप्टर कोसळलं ती झाडंही कापली गेली अन् झाडांनीही पेट घेतला.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा आणि हवालदार सतपाल आदी प्रवास करत होते.

बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.

कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

संबंधित बातम्या:

CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर…

CDS Bipin Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, सीडीएस रावत गंभीर जखमी

Army Chopper Crash : कोसळलेलं हवाई दलाचं भरवशाचं Mi-17 V5!, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये…