मुंबई : भारतीय लष्करासाठी (Indian Army) 15 जानेवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे. भारतीय लष्कर आज 74 व्या सैन्य दिवस (Army Day) साजरा करत आहे. दरवर्षी या दिवशी भारतीय सैन्यातील त्या जवानांना सन्मानित केलं जातं, ज्यांनी निस्वार्थ भावनेनं देशाची सेवा केली. हा दिवस सेनेच्या सर्व मुख्यालयात साजरा केला जातो. दरम्यान, यंदा साजरा होणारा आर्मी डे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीनुसार साजरा केला जाणार आहे.
आर्मी डे 15 जानेवारीला साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहेत. 1 एप्रिल 1895 ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. तर दुसरं कारण म्हणजे याच दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी करियप्पा यांच्याकडे भारतीय सैन्याची कमान सोपवली होती. अशाप्रकारे लेफ्टिनेंट करियप्पा हे भारताचे पहिले सेना प्रमुख बनले. केएम करियप्पा हे ‘किप्पर’ या नावानेही ओळखले जात होते. 1947 च्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तान विरोधातील युद्धात लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं. तर, 14 जानेवारी 1986 रोजी ते फील्ड मार्शलच्या उपाधीसह भारतीय सैन्याचे दूसरे सर्वोच्च रँकिंग अधिकारी बनले होते.
आर्मी डे निमित्तानं संपूर्ण देश आपल्या जवानांचं असामान्य धैर्य, साहस, शहीद जवानांचे बलिदान याची आठवण काढतो. या दिवशी देशातील सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो. यावेळी सैन्य परेड होते. तसंच या दिवशी भारतीय सैन्याने मिळवलेल्या किंवा सैन्यात सहभागी केलेल्या नव्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं जातं. तसंच फील्ड मार्शल एम करियप्पा परेड ग्राऊंडवर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. संख्येच्या दृष्टीनं भारताकडे जगातील दुसरं सर्वात मोठं लष्कर आहे. भारतीय लष्करातील जवानांची संख्या जवळपास 14 लाख आहे.
Watch the live coverage of #ArmyDayParade from KM Cariappa Parade Ground, #NewDelhi from 10:20 am on 15 January 2022. To watch, click on the following links.https://t.co/6vc9YX9XjPhttps://t.co/5MZUpWJsj6https://t.co/0ePDGAzS8P#AmritMahotsav pic.twitter.com/qKcd5EFRUk
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) January 13, 2022
महत्वाची बाब म्हणडे भारतीय लष्करावर आज एक खास गीत प्रदर्शित केलं जाणार आहे. ‘माटी’ असं या गीताचं शिर्षक असेल. गायक हरिहरन यांनी हे गीत गायलं आहे. त्याची माहिती भारतीय लष्कराच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
A specially composed song “Maati”, sung by renowned @SingerHariharan, is being released on the occasion of #ArmyDay 2022.
Save the date #15Jan22.#AmritMahotsav pic.twitter.com/h8Tm5nWN6A— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) January 14, 2022
इतर बातम्या :