कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्यात सुरु असलेल्या सुरु असलेल्या तपासात अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला अर्पिता मुखर्जीच्या अजून एका फ्लॅटमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. उत्तर कोलकाताच्या बेलघरिया परिसरातील प्लॅटमध्ये ही रक्कम मिळाली आहे. याची मालक अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) आहे. या फ्लॅटमध्ये मिळालेली रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशीन आणावी लागली. चार मशीनद्वारे या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून, हे तब्बल 30 कोटीचं घबाड आहे. मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅटमधील प्रत्येक अलमारीमध्ये नोटांची बंडलं होती. तर क्लब टाऊन हाऊसच्या फ्लॅटमधून 5 किलो सोनं आणि चांदीचे शिक्के, तसंच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. 18 तास चाललेल्या या रेडनंतर ईडीचे अधिकारी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून निघाले. एकूण 10 बॉक्समध्ये ही रक्कम एका ट्रकमधून ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत.
Cash of Rs 27.9 crores in cash, gold, and jewellery worth Rs 4.31 crores has been recovered till now from the residence of Arpita Mukherjee, a close aide of West Bengal Minister Partha Chatterjee: Sources pic.twitter.com/ZWJuccciw8
— ANI (@ANI) July 28, 2022
यापूर्वी अर्पिता मुखर्जीला तिच्या दक्षिण कोलकातामधील फ्लॅटमध्ये 21 कोटी रुपये रक्कम मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. म्हणजे अर्पिता मुखर्जीकडे आतापर्यंत तब्बल 50 कोटी रुपयांचं घबाड मिळालं आहे. ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिताच्या बेलघरियाच्या रथाळा भागातील दोन फ्लॅटचं कुलूप तोडण्यात आलं. कारण त्या फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या नाहीत. महत्वाची बाब म्हणजे अर्पिता मुखर्जी ही पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जाते. पार्थ चॅटर्जी यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ED की टीम ने अर्पिता के एक अन्य फ्लैट से इस बार 30 करोड़ रुपए और करीब तीन किलो सोना जब्त किया है.
ED की टीम अर्पिता के घर से जब्त सामान लेकर जा रही है…#ArpitaMukherjee pic.twitter.com/k9j2mbsabw
— Kumar Abhishek (TV9 Bharatvarsh) (@active_abhi) July 28, 2022
ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला सोसायटीच्या दोन फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली आहे. पैसे मोजण्यासाठी तीन मशीन मागवल्या होत्या. जेणेकरुन एकूण किती रक्कम आहे हे कळू शकेल. फ्लॅटमध्ये केलेल्या पाहणीत अनेक महत्वाची कागदपत्रही मिळाली आहेत. अर्पिता मुखर्जीने चौकशीदरम्यान कोलकात्याच्या आसपास असलेल्या तिच्या फ्लॅटमधील मालमत्तेबाबत ईडीला माहिती दिली होती. अर्पिता मुखर्जी तपासात सहकार्य करत आहे. पण मंत्री महोदय सहकार्य करत नसल्याची माहितीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.