AAP: केजरीवाल, भगवंत मान यांची साबरमती आश्रमात सूत कताई, रोडशोही करणार; आपचं ‘मिशन गुजरात’ सुरू?

| Updated on: Apr 02, 2022 | 3:19 PM

दिल्ली स्वारीनंतर पंजाबही (punjab) जिंकल्यानंतर आता आम आदमी पार्टीने (aap) गुजरातकडे मोर्चा ववळवला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

AAP: केजरीवाल, भगवंत मान यांची साबरमती आश्रमात सूत कताई, रोडशोही करणार; आपचं मिशन गुजरात सुरू?
केजरीवाल, भगवंत मान यांची साबरमती आश्रमात सूत कताई, रोडशोही करणार
Image Credit source: arvind kejriwal twitter
Follow us on

अहमदाबाद: दिल्ली स्वारीनंतर पंजाबही (punjab) जिंकल्यानंतर आता आम आदमी पार्टीने (aap) गुजरातकडे मोर्चा ववळवला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने गुजरातकडे आपलं लक्ष वळवलं आहे. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज गुजरात दौऱ्यावर आले आहेत. गुजरातमध्ये महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात जाऊन या दोन्ही नेत्यांनी सूत कताई केली. आश्रमातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हे दोन्ही नेते गुजरातमध्ये रोड शो करणार आहेत. या रोड शोच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल दिल्लीत निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, केजरीवाल हे गुजरातमध्ये आले आहेत. गुजरातमध्ये भाजपचं सरकार असल्याने त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना याबाबतची माहिती दिल्याचं आपच्या कँपेनिंग कमेटीचे अध्यक्ष गुलाब सिंह यादव यांनी सांगितलं.

भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल हे साबरमती आश्रमात आल्यानंतर त्यांनी चरख्यावर सूत कताई केली. साबरमती आश्रमता आल्याने आनंद वाटला. पंजाबात प्रत्येक घरात चरखा असतो. पंजाबमधील लोकांमध्ये गांधींजींबद्दल प्रचंड आदर आहे, असं भगवंत मान यांनी सांगितलं. तर या ठिकाणी राजकारणावर भाष्य करणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

मी नशिबवान समजतो की…

साबरमती आश्रमाच्या भेटीनंतर येथील अभिप्रायाच्या पुस्तिकेत त्यांनी आपल्या मनातील भावना नोंदवल्या. हा आश्रम एक आध्यात्मिक स्थान आहे. या ठिकाणी गांधीजी अजूनही आहेत असं जाणवतं. या ठिकाणी आल्यावर आध्यात्मिक अनुभूती येते. ज्या देशात गांधीजींचा जन्म झाला, त्याच देशात माझाही जन्म झाला, त्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान मानतो, असं केजरीवाल यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिलं आहे.

पोलीस संरक्षणाची मागणी

दोन्ही नेते दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज या दोन्ही नेत्यांचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो होणार आहे. रोड शोसाठी या दोन्ही नेत्यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. गुजरातमध्ये भाजपच सरकार आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्याची आम्ही अहमदाबाद पोलिसांना माहिती दिली आहे, असं आपचे कँपेनिंग कमिटीचे अध्यक्ष गुलाब सिंह यादव यांनी सांगितलं. दरम्यान, केजरीवाल यांनी आतापासूनच गुजरात निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. ही रॅली म्हणजे वातावरण निर्मितीचा भाग आहे. पंजाबमध्ये सत्ता बदल होऊ शकतो, गुजरातमध्ये का नाही? हा संदेश देण्यासाठीच केजरीवाल गुजरातच्या रणमैदानात उतरल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

 

संबंधित बातम्या:

दान गुप्त ठेवा उघड़ करू नका ईडी लागते, नाना पटोले यांची ईडीच्या कार्यपद्धतीवर टीका

Maharashtra News Live Update : प्रभाकर साईलच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश : दिलीप वळसे पाटील

Fuel Prices in Maharashtra: राहुल गांधींनी मोदींना ‘अफगाणिस्तान’ दाखवला, भाजपच्या नेत्यांनी मग त्यांना ‘महाराष्ट्र’ दाखवला, पेट्रोल-डिझेल वॉर सुरु