मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातले. त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध यामुळे जगाभरातील तब्बल 10 कोटी लोकांनी स्थलांतर केल्याची माहिती पुढे येते आहे. इतकेच नाहीतर एकट्या भारतामध्ये (India) जवळपास 50 लाख लोकांनी आपली घरे सोडून इतरत्र स्थलांतर केले. सर्वाधिक स्थलांतर हे चीनच्या लोकांनी केले असून 60 लाख लोक स्थलांतरीत झाले आहेत. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून ही धक्कादायक (Shocking) माहिती पुढे आलीये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरोनाने चीनमध्ये धुमाकूळ घातला होता आणि यादरम्यान हजारो लोकांना आपल्या जीव देखील गमवावा लागला.
चीनमध्ये वाढलेल्या कोरोना केसेस बघता अनेकांनी चीनमधून स्थलांतर केले आहे. जागतिक पातळीवर वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक सातत्याने स्थलांतर करताना दिसत आहेत. आपत्तींमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या यादीमध्ये सर्वात वर चीन आहे. चीनमधून तब्बल 60 लाख लोकांनी स्थलांतर केले. तर दुसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्स आहे, तेथून 57 लोकांनी स्थलांतर केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतामधून तब्बल 50 लाख लोकांनी स्थलांतर केल्याचे आकडेवारीवरून समोर येते आहे.
2021 मध्ये हिंसाचार आणि युद्धामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे जगातील तब्बल 8 कोटी 93 लाख लोकांना इच्छा नसताना देखील स्थलांतर करावे लागले आहे. खतरनाक गोष्ट म्हणजे दहा वर्षांपूर्वीच्या आकड्याच्या तुलनेने हे बघितले गेले तर हा आकडा जवळपास दुप्पटच आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, हिंसाचार, हवामान संकट आणि अफगाणिस्तान, रशिया, युक्रेन युद्धामुळे 2021 मध्ये जगभरातील 10 कोटी लोकांना आपले घर सोडावे लागते आहे. इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी आपत्तींमुळे जगभर 2.37 कोटी लोकांनी आपल्याच देशात अंतर्गत स्थलांतर केले आहे.