नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चीनच्या घुसखोरीवरुन लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चीनने भारताच्या सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलंय तरीही मोदींकडे ते चीनने केल्याचं सांगण्यासाठी धाडस नाहीये, असा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. मोदी सरकारने भारत-चीन सीमेवर चीनने हत्या केलेल्या 20 जवानांचं हौतात्म्य देखील वाया घालवल्याचाही आरोप केलाय (Asaduddin Owaisi criticize Modi Government for not speaking on China infiltration).
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “भारत-चीन सीमेवर चीनने आपल्या 20 जवानांची हत्या केली. मात्र, मोदी सरकार या जवानांचं हौतात्म्य वाया घालवत आहे. भारत अजूनही PP4-PP8 या भागात टेहाळणी करु शकत नाहीये. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एक संपूर्ण गावचं वसवलं आहे. मात्र, हे तुम्हीच केलंय हे चीनला सांगण्याचं सरकारकडे धाडस नाहीये.”
China killed our 20 jawans at India-China border. Govt is letting their martyrdom go just like that. India still can’t patrol at PP4-PP8. China set up a village near LAC in Arunachal Pradesh. Govt doesn’t have courage to tell China that they have done it: Asaduddin Owaisi, AIMIM pic.twitter.com/WOCygXpjIJ
— ANI (@ANI) February 9, 2021
“चीन नाथू ला, सिक्कीम या भागात घुसखोरी करत आहे. मग तरीही सरकारला आणि त्यातही पंतप्रधान मोदींना नेमकी कशाची भीती वाटती आहे? चीन भारताची जमीन बळकावत आहे आणि भारताचे पंतप्रधान चीनचं नावही घेत नाहीये. राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना तरी पंतप्रधान मोदी धाडस दाखवत चीनचं नाव घेतील असं वाटलं होतं,” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
‘पुन्हा चीनने हल्ला केल्यास भारताची काय तयारी आहे?’
“चीन सातत्याने सीमेवर त्यांचं सैन्य वाढवत आहे. सीमेवर पायाभूत सुविधा तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार काय तयारी करतंय? बर्फ विरघळल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारतीय जवानांवर हल्ला केल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी सरकारची काय तयारी आहे?” असाही सवाल खासदार ओवैसी यांनी विचारलाय.
हेही वाचा :
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र
चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला
व्हिडीओ पाहा :
Asaduddin Owaisi criticize Modi Government for not speaking on China infiltration