आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 1937 सुरु असणारी प्रथा बंद करण्याचा हा निर्णय आहे. शुक्रवारचा नमाज अदा करण्यासाठी आसाम विधानसभेत दोन तासांची सुट्टी मिळत होती. आता ही सुट्टी यापुढे मिळणार नाही. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी सुरू केली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि आमच्या आमदारांचे आभार मानतो.
आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजासाठी ब्रेक देण्याचा ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे आसाममध्ये ब्रिटिशकालीन परंपरा संपली आहे.
आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार बिस्वजित फुकन यांनी सांगितले की, भारतात ब्रिटीश काळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी सुट्टी दिली जात होती. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा ब्रेक दिला जात होता. ज्यामध्ये मुस्लिम आमदार दर शुक्रवारी नमाज अदा करत असत. मात्र आता हा नियम आता बदलण्यात आला आहे.
लोकसभा, राज्यसभा आणि इतर राज्यांतील विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय नाही. यामुळेच आसाम विधानसभेत सुरु असलेली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या नियमामुळे सोमवार ते गुरुवारी आसाम विधानसभेचे काम सकाळी 9:30 वाजता सुरु होत होते. परंतु शुक्रवारी सकाळी 9 वाजता काम सुरु होत होते. आता ही परंपरा बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारीसुद्धा सकाळी 9:30 वाजता विधानसभेचे काम सुरु होणार आहे.