कोलकाता: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोठं विधान केलं आहे. कोणीही जिंको, काही फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. (Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)
कपिल सिब्बल यांनी ट्विट करून हे विधान केलं आहे. आज लोकांचा जीव वाचवण्याखेरीज दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. आज निकाला दिवस आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फरक पडत नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे.
कोर्टाकडूनही गंभीर दखल
देशात पाच राज्यांची निवडणूक असतानाच कोरोनाचं संकटही वाढलं आहे. देशातील बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्याही कमी झाली आहे. लोक ऑक्सिजन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही करत आहे. कोर्टानेही या संकटाची गंभीर दखल घेऊन सरकारला फटकारले आहे.
मृतांचा आकडा वाढला
ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथली कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बंगालमध्ये गेल्या 24 तासात 17,411 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 96 कोरोना बळीचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,28,366 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 11,344 वर गेला आहे.
आसाममध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,197 नवे रुग्ण सापडले असून या चोवीस तासात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आंकडा 1,307 वर गेला आहे. केरळमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये 37,199 नवे रुग्ण सापडले असून गेल्या चोवीस तासात 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णांची एकूण संख्या 15,71,183 झाली असून मृतांची संख्या 5,308 वर गेली आहे. तामिळनाडूत गेल्या 24 तासात एकूण 18,692 नवे रुग्ण सापडले आहे. तामिळनाडूत गेल्या चोवीस तासात 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत गेल्या 24 तासात 1,195 नवे रुग्ण आढळले असून 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीतील कोरोना रुग्णांची संख्या 58,622 वर पोहोचली असून मृतांचा आकडाही 805 वर गेला आहे. (Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)
VIDEO | पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतील : शिवसेना https://t.co/aHQRCvr55o #Shivsena | #Saamana | #AssemblyElections2021 | #WestBengal
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
संबंधित बातम्या:
(Whoever wins elections such victories are pyrrhic, says Kapil Sibal)’