नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांचे निवडणूक कल आता पूर्णपणे समजले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजप मध्य प्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा क्रम यंदा सुरु राहिला आहे. काँग्रेससाठी तेलंगणातून चांगली बातमी आहे. तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्टेंकी टक्कर सुरु आहे.
राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. या ठिकाणी यंदाही पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा दिसत आहे आहे.१९९ पैकी १०६ जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेश विधाससभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये 2018 नंतर 15 वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली. परंतु आता काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस दिसत आहे. काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. दोन ठिकाणी इतरांना यश मिळाले आहे.
तेलंगणात विधानसभेसाठी 119 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. बीआरएसने केवळ ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने मात्र चांगली मुसंडी मारली आहे. काँग्रेस ६१ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजपला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.