एक क्षुल्लक चूक देशाच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकतं, प्रचंड कठीण असणाऱ्या Chandrayaan-3 मोहिमेचे बारकावे

| Updated on: Jul 16, 2023 | 12:09 AM

चांद्रयान-3 चा प्रवास हा वाटतो तितका सोपा नाहीय. कारण एकीकडे सोशल मीडियावर भारतीयांकडून उत्साह साजरा केला जातोय. तर दुसरीकडे इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस-रात्र यासाठी मेहनत घेत आहेत. हे यान यशस्वीपणे चंद्रावर लँड झालं तर भारताचं जगात खूप मोठं नाव होईल. पण त्यासाठी चंद्रयान-3 चा अवकाशातील प्रवास हा खूप आव्हानात्मक आहे, असं खगोल शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

एक क्षुल्लक चूक देशाच्या स्वप्नांवर पाणी फेरू शकतं, प्रचंड कठीण असणाऱ्या Chandrayaan-3 मोहिमेचे बारकावे
Chandrayaan 3 successful launch
Follow us on

मुंबई : इस्त्रोचे शास्त्रज्ञ सध्या दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. कारण हा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी सर्वात महत्त्वाचा, मोलाचा आणि कसोटीचा काळ आहे. इस्त्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. भारतीयांकडून प्रचंड आनंद व्यक्त केला जातोय. चांद्रयान 3 चं चंद्रावर लँडिंग कधी होणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पण शास्त्रज्ञांकडून ‘चांद्रयान 3’च्या अडचणींविषयी माहिती सांगण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 आता 36,500 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पोहचले आहे. पण हा प्रवास सोपा नाही. विशेष म्हणजे खगोल शास्त्रज्ञांनी आज एका हिंदी वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या यानाच्या प्रवासावेळची आव्हानं सांगितली आहे.

चांद्रयान 3 चा प्रवास हा वाटतो तितका सोपा नाही. अंतराळात सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला जावून आल्या आहेत. त्या ज्या ठिकाणी जावून आल्या आहेत तिथे भरपूर उपग्रह आहेत. तिथे अडीच लाखांपेक्षा जास्त सक्रीय उपग्रह आहेत. आता एवढ्या उपग्रहांच्या गर्दीला सामोरं जावून स्वत:ला वाचवत पुढे जायचं आहे. त्यामुळे चांद्रयानाला घेऊन जाणाऱ्या रॉकेटचे सेन्सर मजबूत हवेत जे पाहताक्षणी आपली दिशा बदलतील. या उपग्रहांच्या गर्दीतून आपल्या चांद्रयान 3 ला जायचं आहे. या गर्दीचा सामना करण्यास आता सुरुवात झाली आहे, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

चंद्रयान-3 सॅटेलाईटच्या गर्दीतून पुढे जाणार तेव्हा या यानासाठी रस्ता हा मोकळा झालेला असेल. पण तरीही काही अडचणी असू शकतात. हे यान पुढे जात राहणार. इस्त्रोचे शास्त्रज्ञ या यानाचं वजन चाचपडत राहणार, सिग्नलच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार. विशेष म्हणजे या यानाला पुढे अवकाशात धक्के देवून पुढच्या मार्गासाठी पूश केलं जाईल, जेणेकरुन यान चंद्रापर्यंत पोहोचू शकेल, असं खगोल शास्त्रज्ञांनी सांगितलं.

चंद्रयानला इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवून संभाषण

खगोल शास्त्रज्ञांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण सर्वसामान्यपणे संभाषण करतो तेव्हा आपल्या ध्वनीचे तरंग समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात तेव्हा ते संभाषण होतं. पण सॅटेलाईटसोबत संभाषण करायचं असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवलं जातं. चंद्रावरुन येणारी माहिती ही एक सेकंद उशिराने येत असते. कारण लाईट ही 3 लाख किमी प्रतिसेकंदच्या वेगाने धावते. या वेळेचा अभ्यास करायचा, मग योग्य सूचना द्यायच्या, तसेच वजन करायचं हे सगळं सध्याच्या घडीला आव्हानात्मक आहे. कारण चंद्राचा भौगोलिक परिसर हा पृथ्वीसारखा नाही, असं मत खगोला शास्त्रज्ञांनी मांडलं आहे.