Atiq Ahmed Murder Live Video : संधीच दिली नाही, अतिक आणि अशरफ यांचा 10 सेकंदात खेळ खल्लास; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 16, 2023 | 8:06 AM

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. दहा सेकंदातच या हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफचा खेळ खल्लास केल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

Atiq Ahmed Murder Live Video : संधीच दिली नाही, अतिक आणि अशरफ यांचा 10 सेकंदात खेळ खल्लास; व्हिडीओ व्हायरल
Atiq Ahmed and brother Ashraf
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रयागराज : उमेशपाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मोडिकल कॉलेजजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली आहे. दोघांचीही वैद्यकीय चाचणी करायची होती. त्यासाठी त्यांना प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. जेव्हा या दोघा भावांना मेडिकल कॉलेजच्या इथे आणले तेव्हा दबा धरून बसलेल्या तिंघांनी या दोन्ही भावांवर गोळ्या झाडल्या. अत्यंत जवळून या तिघांनी अतिक आणि अशरफवर गोळया झाडल्या. त्यामुळे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या एन्काऊंटर करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अशरफ आणि अतिकची कशी हत्या करण्यात आली आणि अवघ्या दहा सेकंदात कसा खेळ खल्लास झाला हे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर प्रचंड कमेंट येत आहे. दरम्यान, अफवा पसरू नये म्हणून प्रयागराजमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काय आहे व्हिडीओत?

अतिक आणि अशरफ हे दोघे भाऊ मेडिकल कॉलेजजवळ उतरतात. तिथून ते चालत मेडिकल कॉलेजच्या दिशेने जात आहेत. तेवढ्यात मीडियाकडून अतिक अहमदसमोर बूम जातो. अतिक अहमद चालता चालता मीडियाला प्रतिक्रिया देत आहे. इतक्यात ठो ठो असा आवाज येतो. गोळी थेट अशरफला लागते अन् अशरफ काही कळायच्या आत जमिनीवर कोसळताना दिसतो. त्यानंतर दुसरी गोळी अतिकला लागते अन् अतिकही आहे तिथेच कोसळतो.

 

गोळ्यांचा आवाज सुरू झाल्यानंतर मीडियाचे प्रतिनिधीही घाबरतात आणि सैरावैरा धावताना दिसत आहेत. कॅमेरा हलतो. एक हल्लेखोर खाली कोसळलेल्या अतिक आणि अशरफच्या जवळ येतो आणि त्यांना जवळून गोळी घालताना दिसत आहे. या हल्लेखोराच्या पाठी पोलीस आहे. पण पोलीस काहीच करताना दिसत नाही. मात्र, या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे. मान सिंह असं या पोलिसाचं नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

जय श्रीराम

दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. या घोषणा कुणी दिल्या ते स्पष्ट होऊ शकलेले नाहीत. हल्लेखोरांनीच या घोषणा दिल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

हल्लेखोर जेरबंद

या हल्ल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. हे हल्लेखोर कोण आहेत? त्यांनी अतिक आणि अशरफला का मारले? हे हल्लेखोर कोणत्या गँगचे आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. तर राजरोसपणे हल्लेखोर सार्वजनिक ठिकाणी येऊन गोळीबार करत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे योगी सरकारचं फेल्युअर असल्याचंही विरोधक म्हणत आहेत.