इंफाळ – मणिपूरमध्ये जवानांच्या तुकडीवर आयडीक्स हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आसाम रायफलचे अनेक जवान जखमी झाले आहेत.
मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील सिंघाट परिसरात जवानांवर हा हल्ला करण्यात आला आहे. हे दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी आधीच दबा धरून बसले होते. या परिसरात जवान येताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे सर्व जवान आसाम रायफलचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला झाला तेव्हा या जवानांसोबत त्यांच्या कुटुंबातील काही लोक देखील असल्याची माहिती समोर येती आहे. या हल्ल्यात किती जवान जखमी झाले याची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही. या हल्ल्यामागे पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर या संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच जरी या हल्ल्यामागे पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर संघटनेचा हात असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्याप अधिकृतीरित्या कूठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
संबंधित बातम्या
Jharkhand Crime | आधी गळा चिरला, मग दगडाने चेहरा ठेचला, झारखंडमध्ये महिलेची निर्घृण हत्या
Coimbatore | प्राध्यापकाकडून लैंगिक अत्याचार, कारवाईत चालढकल, हताश झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Railways: रेल्वे ‘स्पेशल ट्रेन’ टॅग काढणार, प्री-कोविड तिकिटांच्या किमती लागू होणार