Attacks on Hindus in Bangladesh: बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले वाढत आहेत. त्या देशातील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यात युनूस सरकार अपयशी ठरले आहे. कट्टपंथींपुढे युनूस सरकारने शरणागती पत्कारली आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे 17 वर्षीय हिंदू युवती रात्रभर धावत राहिली. त्यानंतर बांगलादेशातून ती भारतात दाखल झाली. त्याच्या परिवाराची कट्टरपंथींनी हत्या केली होती. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ती युवती इस्कॉन भक्त आहे.
भारतात आलेल्या त्या मुलीने सांगितले, वैध पद्धतीने भारतात येण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली असती. त्यामुळे पायीच भारतात येण्याचा निर्णय घेतला. रात्रभर चालत आणि धावत ती भारतात आली. तिने आपल्यासोबत घडलेली घटनाही पोलिसांना सांगितली. ती १७ वर्षीय मुलगी पश्चिम बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने पोहचली. त्यानंतर तिला सीमा सुरक्षा दलाने पकडले. त्यावेळी तिने भारतात आपले नातेवाईक असल्याचा दावा केला. ती मुलगी बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यात राहत होती.
पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, मुलीच्या भारतीय नातेवाईकांनी सांगितले की, ती मुलगी आणि तिचा परिवार इस्कॉन भक्त आहे. कट्टरपथींनी तिचे आणि तिच्या कुटुंबाचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांची हत्या केली. तिने कट्टरपथींच्या तावडीतून सुटका करुन घेत भारताकडे धाव घेतली. त्या मुलीचे वडील बांगलादेशात मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह होते.
बांगलादेशात हिंदूंवर हल्ले वाढत आहे. त्यानंतर पोलिसांकडून कट्टरपथींयांवर कारवाई केली जात नाही. २५ नोव्हेंबर रोजी ढाकाचे हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इस्कॉनच्या भक्तांना टार्गेट केले जात आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या घरांवर जमाव हल्ले करत आहे. त्यांची संपत्ती लुटून नेत आहे. मंदिरांवर हल्ले केले जात आहे.