10, 20 , 50 नाही तर 88 स्टेशनवर थांबते ही ट्रेन, फेस्टिवल सीजनमध्ये आरक्षण फुल

| Updated on: Nov 01, 2024 | 9:57 AM

देशात सर्वात लांब अंतराची ट्रेन विवेक एक्‍सप्रेस (ट्रेन 22504 व 22503) आहे. ही ट्रेन आसामधूनच सुरु होते. तिचा मार्ग डिब्रूगढपासून सुरु होऊन तामिळनाडूमधील कन्‍याकुमारीपर्यंत आहे. तब्बल 4153 किमी अंतर ही ट्रेन पार पाडते.

10, 20 , 50 नाही तर 88 स्टेशनवर थांबते ही ट्रेन, फेस्टिवल सीजनमध्ये आरक्षण फुल
Railway
Follow us on

Indian Railways: भारतीय रेल्वेतून रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेच्या रोज दहा हजारापेक्षा जास्त गाड्या धावत असतात. रेल्वे प्रवास सर्वांना सुखकारक असल्याने अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यात कमी वेळेत आणि कमी स्टॉपेज असणाऱ्या शताब्‍दी, वंदेभारत, राजधानीसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवास करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. या प्रीमियम ट्रेन मुख्य स्थानकावर जास्त वेळ थांबतात. इतर ठिकाणी दोन मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाही. परंतु देशातील एक ट्रेन अशी आहे की तिचे तब्बल 88 स्टॉपेज आहेत. त्यानंतर सणांच्या काळात तिचे आरक्षण फुल असते. भारतातील विवेक एक्‍सप्रेसनंतर सर्वात लांब मार्गावर धावणारी ही ट्रेन आहे. ट्रेन नंबर 15909/15910 अवध आसाम ही ट्रेन डिब्रूगढ ते लालगढ जंक्शन दरम्यान धावते.

किलोमीटर आंतर, 88 स्‍टेशनावर थांबा

आसाममधील डिब्रूगढपासून ते राजस्थानमधील लालगढपर्यंत 3100 किलोमीटर आंतर ही ट्रेन धावते. या दरम्यान ही ट्रेन 88 स्‍टेशनावर थांबा घेते. या ट्रेनचे थांबे मोजता मोजता तुम्हाला दम लागेल. दिवाळी आणि छठ पूजेसाठी या ट्रेनला कधीपासून वेटिंग सुरु होती. आता रेल्वेने आरक्षणाचा कालावधी 120 दिवसांवरुन 60 दिवसांवर आणला आहे.

चार तासांचा वेळ थांबांमध्ये

88 स्टेशनावर थांबणाऱ्या या ट्रेनचे चार तास स्टापेजमध्येच जातात. ही ट्रेन सरासरी दोन ते पाच मिनिटे थांबते. ही ट्रेन दोन-चार नाही अनेक राज्यांमधून जाते. आसाम नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या राज्यातून या ट्रेनचा मार्ग आहे.

हे सुद्धा वाचा

देशात सर्वात लांब अंतराची ट्रेन विवेक एक्‍सप्रेस (ट्रेन 22504 व 22503) आहे. ही ट्रेन आसामधूनच सुरु होते. तिचा मार्ग डिब्रूगढपासून सुरु होऊन तामिळनाडूमधील कन्‍याकुमारीपर्यंत आहे. तब्बल 4153 किमी अंतर ही ट्रेन पार पाडते. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत ही ट्रेन जाते. संपूर्ण प्रवासात ही ट्रेन 59 स्‍टेशनांवर थांबते. त्यानंतर अवध एक्स्प्रेस 88 रेल्वे स्टेशनवर थांबते.