अयोध्या, दि.20 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी आता दोन दिवस उरले आहेत. सोमवारी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यापूर्वी कर्नाटकातील मूर्तीकर अरुण योगराज यांनी तयार केलेली मूर्ती गर्भगृहात विराजमान करण्यात आली. रामलल्लाच्या या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टकडून या मूर्तीला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, मूर्तीचे फोटो काढणाऱ्याचा ट्रस्टकडून शोध सुरु करण्यात आला आहे. त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अयोध्यामध्ये 22 जनवरी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा समारंभापूर्वी भगवान रामच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर खळबळ उडाली. आता रामलल्लाचा फोटो लीक करणाऱ्याविरुद्ध श्रीराम मंदिर ट्रस्ट अॅक्शन मोडमध्ये आला आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता ट्रस्ट हा फोटो लीक करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करणार आहे. रामलल्लाचा हा फोटो एलएंडटीच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडून लीक झाल्याचा संशय ट्रस्टला आहे.
मूर्तीकार अरुगण योगीराज यांच्या पत्नीने प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा फोटो लीक होणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या मूर्तीचा फोटो काढून व्हायरल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लीक झालेल्या रामललाच्या मूर्तीत भगवान विष्णूचे 10 अवतार दिसत आहेत. भगवान विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की आवतार यामध्ये दिसत आहेत. मूर्तीच्या खालच्या बाजूला एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरूड दिसत आहे. या मूर्तीत सूर्य, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा आहे. परंतु ट्रस्टकडून अजूनही दुजोरा दिला नाही.
22 जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग यादिवशी आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे.